मास्टर ब्लास्टरने सोशल मीडियावरील 'त्या' फोटोपासून केले सावध

Sachin Tendulkar send notice to Big Daddy casino of goa
Sachin Tendulkar send notice to Big Daddy casino of goa esakal
Updated on

भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज (दि. 24) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने सांगितले की त्याने गोव्यातील बिग डॅडी कसिनोवर (Big Daddy Casino) कायदेशीर कारावाई करण्याबद्दलची नोटिस पाठवली आहे. सचिन तेंडुलकरने दावा केला आहे की या कसिनोने त्यांच्या प्रमोशनसाठी त्याचा फोटो (Morphed Photo) परवानगीशिवाय वापरला. (Sachin Tendulkar send notice to Big Daddy casino of goa for using his morphed photo)

Sachin Tendulkar send notice to Big Daddy casino of goa
VIDEO: तेंडुलकरने आजच वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकाची दारे उघडून दिली होती

सचिन आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहितो की, 'या प्रकरणात माझी कायदेशी बाबी बघणारी टीम योग्य ती कारवाई करेल. पण मला वाटते की याबाबतची माहिती तुम्हा सर्वांना असावी.' तो आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितो, 'माझ्या असे लक्षात आले की माझ्या अनेक जाहिराती सोशल मीडियावर (Social Media) येत आहेत. या जाहिरातीत माझा मॉर्फ केलेला फोटो कसिनोची जाहिरात करण्यासाठी वापरण्यात येत आहे.'

Sachin Tendulkar send notice to Big Daddy casino of goa
क्रिकेटर शार्दूल ठाकूर कोल्हापुरात; आमदार ऋतुराज पाटलांची घेतली भेट

क्रिकेट (Cricket) जगतात दैवत्व प्राप्त झालेला, भारत रत्न सचिन तेंडुलकर हा स्वच्छ चारित्र्य आणि आदर्श व्यक्तीमत्वासाठी ओळखला जातो. ज्यावेळी त्याला त्याच्या फोटोचा लोक गैरवापर करत असल्याचे दिसले त्यावेळी त्याला दुःख झाले. तो म्हणाला की, 'मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कधीही जुगार, तंबाखू किंवा दारूची जाहिरात केली नाही. मला माझ्या फोटोचा गैरवापर झालेला पाहून दुःख झाले आहे.' सचिनने या पोस्ट बरोबरच लोकांना विनंती केली की सोशल मीडियावर चुकीची माहिती देणाऱ्या फोटोपासून सतर्क रहा असा सल्ला देखील दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.