सचिन-शेन वॉर्नला भावलेला 'लिटल लेग स्पिनर' आहे तरी कोण?

खराब खेळपट्टीवर एक दोन वेळा नव्हे तर प्रत्येक चेंडूवर तो फलंदाजाला चकवा देताना दिसते.
Sachin Share Video
Sachin Share VideoSakal
Updated on

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला एका सहा वर्षांच्या फिरकीपटूनं प्रभावित केले आहे. तेंडुलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सहा वर्षांच्या फिरकीच्या जादूगाराची कमाल दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. सचिन तेंडुलकरने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात एक सहा वर्षांचा मुलगा गल्ली क्रिकेटमध्ये आपल्या सहकाऱ्यांना गोलंदाजी करताना दिसते. तो अप्रतिम लेग स्पिन टाकतोय. खराब खेळपट्टीवर एक दोन वेळा नव्हे तर प्रत्येक चेंडूवर तो फलंदाजाला चकवा देताना दिसते.

त्याच्या फिरकीतील जादू पाहून सचिन तेंडुलकरही आवाक झालाच त्याच्याशिवाय क्रिकेट जगतातील फिरकीचा 'बाप माणूस' असलेला शेन वॉर्नलाही या मुलाच्या फिरकीने आवाक केले आहे. सचिन तेंडुलकरने हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. सचिनने खास कॅप्शनसह छोट्या फिरकीपटूचे कौतुक केले आहे. मास्टर ब्लास्टरने लिहिलंय की, अप्रतिम; हा व्हिडिओ एका मित्राने पाठवला आहे. या छोट्याशा मुलाचे क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि जिद्द दिसून येते, असा उल्लेख सचिनने केलाय.

Sachin Share Video
हिटमॅनसह सूर्याही चमकला; टीम इंडियाने उडवला कांगारुंचा धुव्वा

सचिनशिवाय क्रिडा क्षेत्रातील अन्य काही मंडळींनी देखील या व्हिडिओतील मुलाच्या फिरकीला दाद दिली आहे. त्यानंतर हा मुलगा नेमका कोण? तो कोणत्या क्लबमधून खेळतोय? तो कधीपासून गोलंदाजीचा सराव करतो? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर त्याच्या फिरकीची जादू पाहणाऱ्या प्रत्येकालाच पडला होता.

कोण आहे सचिन-शेन वॉर्नच्या कौतुकास पात्र ठरलेला तो मुलगा?

सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे यात लेग स्पिनरने सर्वांना अवाक करणाऱ्या छोट्या फिरकीपटूचे नाव असदुझमान सदीद असे आहे. काही व्हिडिओमध्ये तो 10 नंबरची जर्सी घालूनही गोलंदाजी करताना दिसला आहे. हा मुलगा बांगलादेशमधील बारिशल या शहरातील आहे. त्याच्यामध्ये लेग स्पिनसह गुगली टाकण्याचे कौशल्य कमालीचे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे व्हिडिओ पाहून त्याने गोलंदाजीत जादूई अंदाज निर्माण केला आहे. बांगलादेशचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाकिब अल हसनप्रमाणेच त्याला अष्टपैलू खेळाडू व्हायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()