सचिन रोहित-राहुल जोडी आणि वर्ल्डकप ट्रॉफीबद्दल काय म्हणाला?

Sachin Tendulkar Statement About Rohit Sharma and Rahul Dravid Pair
Sachin Tendulkar Statement About Rohit Sharma and Rahul Dravid Pairesakal
Updated on

विराट कोहलीने (Virat Kohli) टी २० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आले आहे. याचबरोबर संघ व्यवस्थापनात अजून एक बदल झाला. रवी शास्त्रींच्या (Ravi Shastri) जागी आता राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपचा कार्यक्रम जाहीर झाला. या सर्व गोष्टींवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भाष्य केले आहे. (Sachin Tendulkar Statement About Rohit Sharma and Rahul Dravid Pair)

Sachin Tendulkar Statement About Rohit Sharma and Rahul Dravid Pair
गल्ली क्रिकेट ते चॅलेंजर ट्रॉफी ; दिशा कासटचा प्रेरणादायी प्रवास

सचिन तेंडुलकरने बॅकस्टेज विथ बोरया या कार्यक्रमादरम्यान भारतीय संघ अजून एकदा वर्ल्डकप उंचावताना पहायचे आहे असे वक्तव्य केले. तो म्हणाला, 'या वर्षी एप्रिल महिन्यात भारताला वर्ल्डकप (World Cup) उंचावून ११ वर्षे होतील. आता खूप वाट पाहिली आहे. माझ्याबरोबर सर्वांनाच बीसीसीआयच्या (BCCI) कपाटात ती ट्रॉफी बघायला आवडेल. या ट्रॉफीसाठीच सर्व क्रिकेटर खेळत असतात. यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शतक नाही. मग ती टी २० मधील असो वा वनडे क्रिकेट, वर्ल्डकप ही खास गोष्ट असते असे माला वाटते.'

Sachin Tendulkar Statement About Rohit Sharma and Rahul Dravid Pair
कृणालबरोबर भांडण झालेल्या दीपक हुड्डाने कधीच पैशाची मागणी केली नाही

सचिन तेंडुलकरने भारताची नवी कर्णधार प्रशिक्षक जोडी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड (Rohit Sharma and Rahul Dravid Pair) यांच्याबद्दलही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'रोहित - राहुल ही जबरदस्त जोडी आहे. हे लोक त्यांचे सर्वस्व पणाला लावतील याची मला खात्री आहे. त्या दोघांना अनेक लोकांचा पाठिंबा आहे. फक्त हा पाठिंबा योग्य वेळी मिळणे गरजचे असते. सर्वजण चांगल क्रिकेट (Cricket) खेळले आहेत. राहुलला त्याच्या मार्गात चढ उतार येणार याची कल्पना आहे. तो तेवढं क्रिकेट खेळला आहे. फक्त आशा सोडू नयेत, सातत्याने प्रयत्न करत रहा, पुढे जात रहा.'

Sachin Tendulkar Statement About Rohit Sharma and Rahul Dravid Pair
रोहित शर्माला माजी कर्णधार अझहरूद्दीनचे रेकॉर्ड मोडण्याची संधी

भारताचा ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्डकपमध्ये पहिलाच सामना पाकिस्तान बरोबर होणार आहे. गेल्या टी २० वर्ल्डकपमध्येही भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानबरोबर (India vs Pakistan) झाला होता. पाकिस्तानने हा सामना १० विकेट्सनी जिंकला होता. आता भारत २३ ऑक्टोबरच्या या मेलबर्नवरील सामन्यात या पराभवाचे उट्टे काढण्याचा जोरदार प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.