Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने सांगितले सूर्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे रहस्य

Sachin Tendulkar Statement About Suryakumar Yadav consistent Performance
Sachin Tendulkar Statement About Suryakumar Yadav consistent Performanceesakal
Updated on

Sachin Tendulkar Statement About Suryakumar Yadav : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकपचे सराव सामने खेळत आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने गेल्या काही सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे रहस्य टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

Sachin Tendulkar Statement About Suryakumar Yadav consistent Performance
Sourav Ganguly : BCCI चं ठरलंय! ममतांनी पंतप्रधांनाना केलेल्या विनंतीला केराची टोपली

सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला भारतीय संघातील एक्स फॅक्टर असलेला खेळाडू आहे. तो भारतीय संघातील असा खेळाडू आहे ज्याची विकेट प्रतिस्पर्धी संघासाठी खूप महत्वाची आहे. सचिन तेंडुलकरच्या निरीक्षणानुसार सूर्याची जडणघडण ही मुंबई आणि मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना झाली.

याबाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, 'प्रोत्सहन देणे आणि कामगिरीचं कौतुक करणे यापेक्षा चांगले टॉनिक असू शकत नाही. सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. यश आणि कौतुकाची थाप यामुळे त्याच्या व्यक्तीमत्वात देखील बदल झाला आहे. तो सध्याच्या घडीला खूप आत्मविश्वासाने खेळत आहे. त्याला आता संघात स्थान मिळणार की नाही याची चिंता करावी लागत नाही.'

Sachin Tendulkar Statement About Suryakumar Yadav consistent Performance
Asia Cup 2023 : भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? जय शहांनी स्पष्ट सांगितले

ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवकडून सर्वांच्याच अपेक्षा आहेत. भारतीय संघात वयाची तिशी ओलांडल्यानंतर संधी मिळालेला सूर्यकुमार यादव कमी वेळातच भारतीय संघातली प्रमुख फलंदाज बनला आहे. त्याच्या संघातील समावेशामुळे चौथ्या क्रमांकाचा दर्जेदार फलंदाज भारताला मिळाला असून विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मावरील भार देखील कमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.