Sanath Jayasuriya: '...तर सचिनने धावांचा पाऊस पाडला असता', नव्या नियमावर जयसूर्या यांचे मत

विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर उपांत्य लढतीत ५०वे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९व्या शतकांना मागे टाकले
Sanath Jayasuriya
Sanath JayasuriyaEsakal
Updated on

विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर उपांत्य लढतीत ५०वे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९व्या शतकांना मागे टाकले. यानंतर चोहोबाजूंनी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

याचदरम्यान श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांच्याकडून एक प्रतिक्रिया आली. त्यांच्या मते आयसीसीकडून झटपट क्रिकेटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याचा फायदा फलंदाजांना होत आहे. सचिन तेंडुलकर याने सध्याच्या आयसीसी नियमात फलंदाजी केली असती, तर त्याने धावांचा व शतकांचा पाऊस पाडला असता.

Sanath Jayasuriya
Virat Kohli 50th century : फ्लाईंग किस अन् आनंदाश्रू ! सचिनचा विक्रम मोडल्यावर असं केलं अनुष्काने विराटचं कौतुक

विराट कोहलीच्या शतकाने सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा विक्रम मागे पडला. यामुळे सनथ जयसूर्या यांना आपले मत सोशल माध्यमावर व्यक्त करावे लागले, असे नाही. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस यांनी सोशल माध्यमावर आयसीसीच्या नव्या नियमावर दृष्टिक्षेप टाकला.

Sanath Jayasuriya
Gautam Gambhir : विराट - रोहित नाही तर 'हा' भारताचा गेम चेंजर फलंदाज; गंभीर कोणाबद्दल बोलतोय?

ते म्हणाले, आयसीसीच्या नव्या नियमानुसार दोन्ही बाजूने नव्या चेंडूंचा वापर केला जात आहे. याचा फायदा फलंदाजांना होत आहे; पण मला असे वाटत आहे की, ३० षटकांनंतर एक चेंडूचा वापर बंद करावा. जेणेकरून त्यामुळे एक चेंडू निदान ३५ षटकांपर्यंत खेळवला जाईल; अन्‌ यामुळे रिर्व्हस स्विंग ही कला लोप पावणार नाही. गोलंदाजांसाठी रिर्व्हस स्विंग ही महत्त्वाची बाब असते. वकार युनूस यांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर सनथ जयसूर्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.