SA vs IND 1st ODI : रिंकू सिंगला डावलले तर साई सुदर्शनचे पदार्पण...! कर्णधार KL राहुलने संघात केले मोठे बदल

SA vs IND 1st ODI
SA vs IND 1st ODI
Updated on

Sai Sudharsan makes ODI debut South Africa vs India odi series News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने या मालिकेसाठी युवा संघाची निवड केली असून एका युवा खेळाडूला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेत भारताचे कर्णधार असलेल्या केएल राहुलने डावखुरा फलंदाज बी साई सुदर्शनला पदार्पणाची संधी दिली आहे.

SA vs IND 1st ODI
Rohit Sharma : रोहित आम्हाला द्या... 'या' IPL संघाने साधला होता मुंबई इंडियन्सशी संपर्क

सामन्यापूर्वी सुदर्शनला कॅप देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधील गुजरात टायटन्सने सुदर्शनला लिलावात विकत घेतले. IPL-2023 च्या फायनलमध्ये सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 96 धावांची इनिंग खेळली होती. त्याने इमर्जिंग आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते.

SA vs IND 1st ODI
SA vs IND : भारताविरुद्धच्या पहिल्या ODI मध्ये दक्षिण आफ्रिका का घालणार गुलाबी जर्सी? मोठे कारण आले समोर

टी-20 मध्ये आपल्या बॅटची ताकद दाखवणाऱ्या फिनिशर रिंकू सिंगला वनडेमध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. राहुलने संजू सॅमसनला संधी दिली आहे. संजू सॅमसन वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघासोबत होता. पण आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाचा भाग नव्हता. या मालिकेत निवडकर्त्यांनी कसोटी संघाचा भाग असलेल्या काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे आणि त्यामुळे संजूला संधी मिळाली आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 :

  • दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), टोनी डी जोर्गी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वायअन मुल्डर, अँडिले फेहुल्क्वॉय, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.

  • भारत : केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, बी, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.