Saina Nehwal: आता ८-९ तासांचा सराव करू शकत नाही, निवृत्तीचा विचार चालू... सायनाने स्पष्टच सांगितलं

Saina Nehwal on Retirement: सायना नेहवालने निवृत्तीचे संकेत देताना अनेक महिन्यांपासून बॅडमिंटनपासून दूर होण्याचं खरं कारणही सांगितलं आहे.
Saina Nehwal
Saina NehwalSakal
Updated on

Saina Nehwal on her Career: गेले अनेक महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर असलेल्या साईना नेहवालने आपल्याला संधीवात झाल्याचे उघड केले आहे, त्यामुळे वर्षाअखेरीस आपण आपल्या भवितव्याबाबत निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. या आजारामुळे आपण नेहमीचा सराव करू शकत नसल्याचेही तिने म्हटले आहे.

३४ वर्षीय साईना ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनचे पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली होती. तिने हे यश लंडन २०१२ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. साईना एकूण तीन ऑलिंपिकमध्ये खेळलेली आहे. याव्यतिरिक्त साईनाने २०१० आणि २०१८ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे.

'माझा गुडघाही सक्षम राहिलेला नाही. त्यातच संधीवाताचा त्रास होत आहे. हाडांमधील कूर्चही कमकुवत झाली आहे. त्यामुळे आठ ते नऊ तासांचा सराव मी करू शकत नाही', असे साईनाने गगन नारंग यांनी आयोजित केलेल्या पॉडकॉस्टमध्ये बोलताना सांगितले.

Saina Nehwal
Saina Nehwal: बुमराह माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही! सायना नेहवालची क्रिकेटवरील कमेंट पुन्हा चर्चेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.