Sakshi Malik Asian Games : एकता तोडण्याचा प्रयत्न... दोन कुस्तीपटूंना झुकतं माप दिल्यावर साक्षी स्पष्टच बोलली

Sakshi Malik Asian Games
Sakshi Malik Asian Games esakal
Updated on

Sakshi Malik Asian Games : ऑलिम्पिक पदक विजेता साक्षी मलिकने एशियन गेम्समध्ये निवड चाचणीत सूट देण्याच्या निर्णयावर वाद निर्माण झाल्यानंतर अखेर आपली प्रतिक्रिया दिली. साक्षी मलिकने स्पष्टपणे सांगितले की तिने कधीही निवड चाचणीच सूट मिळावी अशी मागणी केली नव्हती.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अस्थायी समितीने विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्याप्रमाणे तिलाही याबाबतची विचारणा केली होती. साक्षी मलिक म्हणाली की बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटला निवड चाचणीत सूट देण्याची ऑफर देऊन सरकारने कुस्तीपटूंची एकता तोडण्याचा प्रयत्न केला आहे. (Sakshi Malik News)

Sakshi Malik Asian Games
Ayesha Naseem Retirement : पुढचं आयुष्य इस्लाम... पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू 18 व्या वर्षी निवृत्त!

साक्षी मलिक, विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि बजरंगने (Bajrang Punia) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत जंतर मंतरवर आंदोलन केलं होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून दिल्लीच्या न्यायायलायने बृजभूषण यांना या प्रकरणात जामीन देखील दिला आहे.

साक्षी मलिक सध्या अमेरिकेत आपला सराव करत आहे. तिने भारतात घडलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की एशियन गेम्ससाठी सरावाला तयारी मिळावी यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. आम्ही निवड चाचण्या ऑगस्ट महिन्यात घेण्याची मागणी केली होती. सरकारने आम्हाला वेळ दिला म्हणून आम्ही इथं सराव करण्यासाठी आलो आहोत.'

Sakshi Malik Asian Games
Mukesh Kumar : अखेर मानाची कॅप मिळाली! टॅक्सी ड्रायव्हचा मुलगा मुकेश कुमार करणार कसोटी पदार्पण

साक्षी पुढे म्हणाले की, 'गेल्या तीन - चार दिवसात कळालं की दोन खेळाडूंना थेट प्रवेश दिला जाणार आहे. मला देखील ई - मेल करण्यास सांगितले होते. जेणेकरून माझ्या नावाचा देखील विचार व्हावा. मात्र मी स्पष्ट नकार दिला. मी निवड चाचणीशिवाय कोठे जात नाही. मी कोणत्यात स्पर्धेत निवड चाचणीला सामोरे न जात सहभागी झालेले नाही यापुढे देखील होणार नाही. आम्ही फक्त ट्रायलसाठी अतिरिक्त वेळ मागितला होता.'

'मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की सर्वांना निवडीची संधी मिळाली पाहिजे.' साक्षीने यापूर्वी एक ट्विट करून सरकार दोन कुस्तीपटूंना थेट प्रवेश देत कुस्तीपटूंची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.