नवी दिल्ली : ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटू यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसेच त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यादरम्यान साक्षी मलिक या खेळाडूच्या लग्नाला स्वतः ब्रिजभूषण यांनी हजेरी लावल्याचा फोटोही व्हायरल होत असून यावर साक्षीला प्रश्न विचारले जात आहेत. या फोटोवर आता तिनं स्वतः मौन सोडलं आहे. आपल्या निवेदनात तिनं गंभीर आरोप केला आहे. (Sakshi Malik Finally Breaks Silence on Viral Wedding Picture With Brij Bhushan Singh)
साक्षीनं आपल्या निवदेनात काय म्हटलंय?
साक्षी मलिकनं आपल्या निवेदनात म्हटलं की, ब्रिजभूषण सिंह हे कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष होते आणि अजूनही आहेत. मला हे सांगायचं आहे की, आम्ही कुस्ती खेळतो आम्हाला ६-७ महिने कॅम्पमध्ये रहावं लागतं. त्यानंतर जेव्हा खेळांचा सिझन नसतो तेव्हा आम्ही ३-४ महिन्यांसाठी घरी जातो. या काळात अध्यक्षांशी भेटीगाठी होत असतात. पण ते अधुनमधून प्रॅक्टिसवेळी, राष्ट्रीय खेळांवेळी, कॅम्पमध्ये येत होते. जर मी त्यांना माझ्या लग्नात निमंत्रित केलं नसतं तर त्यांच्याकडून काही निगेटिव्ह होऊ शकतं, समजतंय ना? त्यांची ताकद मोठी आहे. जर त्यांना निमंत्रण दिलं नाहीतर काही उलटंही होऊ शकतं"
दरम्यान, नुकतेच आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक हीच्या लग्नातला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह देखील होते. यानंतर साक्षीवर टीका करताना अनेकांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. युजर्सनं तिला प्रश्न विचारले होते की, एखाद्या मुलीला कोणी त्रास देत असेल तर तीनं आपल्या लग्नात ब्रिजभूषण सिंहांना का बोलावलं?
युजर्सच्या अशा प्रश्नाला पार्श्वागायिका चिन्मयी श्रीपाद हीनं रिट्विट करत उत्तर दिलं होतं. तिनं म्हटलं होतं की, एखाद्या महिलेला छेडछाड करणारी व्यक्ती सत्तेत असेल तर तिच्यापुढे काहीही पर्याय नसतो. चिन्मयीच्या या रिट्विटवर साक्षी मलिकनं सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.