Sakshi Malik : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत आपण कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली होती.
आता क्रीडा मंत्रालयाने संपूर्ण समितीच निलंबित केल्यानंतर साक्षी मलिक काय म्हणते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र साक्षीने यानंतर सावध प्रतिक्रिया दिली. तिला अजूनही क्रीडा मंत्रालयाच्या हेतूबाबत शंका असल्याचे तिच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत साक्षी म्हणाली की, 'मी अजून लेखी असं काही पाहिलेलं नाही. मला माहिती नाही की फर्त संजय सिंह यांना निलंबित केलं आहे की संपूर्ण समितीच निलंबित केली आहे. आमची लढाई ही सरकारविरूद्ध नाहीये. आमची लढाई ही महिला कुस्तीपटूंसाठी आहे. मी निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र येणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे.'
साक्षीबरोबरच विनेश फोगाटने देखील क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली होती. विनेशने आपल्या प्रतिक्रियेत विनेशने आम्ही लढलो नसतो तर महिलांना, तरूण महिला कुस्तीपटूंना त्यांचा आवाज उठवणे अवघड झालं असते. आम्ही जे सहन केलं ते इतर कुस्तीपटूंना सहन करावं लागू नये.
विनेश फोगाट पुढे म्हणाली की, ज्यांनी चुकीचं केलं त्यांना शिक्षा व्हावी. भारतीय कुस्ती परिषदेत महिलांसाठी काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. आम्ही पहिल्या दिवसापासूनच हे सांगत आलो आहे.
क्रीडा मंत्रालयाने झटका दिल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणुकीची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि लोकशाही पद्धतीने झाली आहे. आता क्रीडा मंत्रालयासोबत चर्चा करायची की कायदेशीर मार्ग अवलंबायचा हे ठरवणे परिषदेतील नवीन समितीचं काम आहे. माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.