BCCI New Selection Committee Who is Salil Ankola : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष निवड समितीची निवड केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीकडे आलेल्या सुमारे 600 अर्जांपैकी 5 दिग्गजांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये एका नावाने अनेकांना चकित केले ते म्हणजे सलील अंकोला.
सलील अंकोलाने वयाच्या 28व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. अनेक वर्षे टीव्ही आणि फिल्मी दुनियेत काम केल्यानंतर सलील पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. त्याची भूमिका आता खेळाडूंचे भविष्य घडविण्याशी संबंधित असणार आहे.
भारताच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये 5 दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. त्यात चेतन शर्माचाही समावेश आहे जो याआधी निवड समितीचा प्रमुख होता. त्यांच्याशिवाय शिव सुंदर दास, सुब्रत बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन सैराट यांचा या समितीत समावेश आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार बोर्डाकडे यासाठी सुमारे 600 अर्ज आले होते.
सलील अंकोला हा मध्यमगती गोलंदाज आहे ज्याने भारतासाठी एक कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कराची येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात त्याने फक्त 2 बळी घेतले होते. त्याने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 18 डिसेंबर रोजी त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 4 षटके टाकली आणि 2 बळी घेतले. त्यानंतर क्रिस श्रीकांत टीम इंडियाची कमान सांभाळत होता.
सलील अंकोला वनडेत 13 विकेट्स आहेत. आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 181 विकेट घेतल्या आणि एका अर्धशतकाच्या मदतीने एकूण 707 धावा केल्या. 2020 मध्ये त्यांना मुंबई क्रिकेटचे मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले.
सलील अंकोला क्रिकेट क्षेत्रापासून दूर गेला आणि टीव्हीच्या जगाकडे वळला पण तो तेवढा यशस्वी होऊ शकला नाही. वयाच्या 28 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. कुरुक्षेत्र या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट जगतात पदार्पण केले. यानंतर त्याने फादर, चुरा लिया है तुमने यांसारख्या चित्रपटात काम केले. एवढेच नाही तर बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही तो सहभागी झाला होता. त्यानंतर करम अपना-अपना टीव्ही शोमध्ये दिसला.
त्यानंतर बालाजी फिल्म्ससोबत झालेल्या वादामुळे त्यांचे टीव्ही करिअरही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते. अनेक वर्षांनंतर त्यांनी पुन्हा सावित्री, रिवायत, सावध इंडिया आणि कर्मफल दाता शनी या टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले. तो 2018 मध्ये तेरा इंतजार, 2019 मध्ये एकता, 2021 मधील द पॉवर या चित्रपटातही दिसला होता परंतु हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत. द पॉवरचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.