डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. 2017 मध्ये भारतीय संघातून पदार्पण करणारा फिरकीपूट आपल्या हटके गोलंदाजी शैलीने चर्चेत आला. 2019 इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून त्याच्या गोलंदाजीतील कमाल कमी झालीये. वर्ल्ड कपनंतर कुलदीपने 12 वनडेत 58.41 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्यात. 26 वर्षीय कुलदीप यादवला आयपीएलमध्येही प्लेइंग इलेव्हनमध्ये पंसती मिळाली नाही. तो केवळ एक सामनाच खेळला. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असतानाही संघात स्थान न मिळाल्याची खंत काही दिवसांपूर्वीच त्याने बोलून दाखवली होती. आता त्याला पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट्टने सल्ला दिलाय.
कामगिरीत सुधारणा करुन कुलदीप यादव टीम इंडियात कसे कमबॅक करु शकतो, यावर सलमान बट्टने भाष्य केले आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर त्याने एक व्हिडिओ अपलोड केलाय. टी-20 क्रिकेटमुळे कुलदीप यादवची लाईन लेंथ बिघडली आहे, असे सलमानने म्हटले आहे. डावखुऱ्या फिरकीपटूमध्ये आत्मविश्वास दिसत नाही. त्याला आता बेसिक गोष्टीवर काम करावे लागेल. आत्मविश्वास मिळवण्यासाठी कुलदीप यादवने रणजी सामन्यात खेळावे, असा सल्ला सलमान बट्टने दिलाय. मोठ्या फॉर्मेटपेक्षा छोट्या फॉर्मेटमध्ये अधिक खेळल्याने लाईन लेंथवर परिणाम होतो. छोट्या फॉर्मेटमध्ये गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी करुन मोकळे व्हायचा विचार करत असतो. हेच त्याच्या मूळावर उठते, असेही सलमान म्हणाला.
मर्यादित षटकांपेक्षा कसोटी सामन्यात खेळल्याने प्रतिभा अधिक सुधारते. सध्याच्या घडीला टीम इंडियात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना अधिक पसंती मिळते. कुलदीपकडे रणजीत चांगली कामगिरी करुन संघात कमबॅक करण्याची संधी आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता असून त्याला केवळ आत्मविश्वास परत मिळवण्याची गरज आहे, असेही सलमानने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.