Wrestler Sambhaji Patil : सत्तावीस इंचाच्या मांड्या असणारा महाराष्ट्र केसरी पडद्याआड

Wrestler Sambhaji Patil
Wrestler Sambhaji Patil esakal
Updated on

- गोविंद घारगे, उस्मानाबाद

1982 साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने बीड मुक्कामी नियोजित केले होते. खूप दिवसांनी मराठवाड्यात महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होणार होती. यामुळे मराठवाड्याच्या कुस्ती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अजिंक्य पैलवान हिंदकेसरी मारुती माने यांची सर्वानुमते यावेळी निवड करण्यात आली होती. कुस्तीगीर परिषद महाराष्ट्रातील विविध भागात फिरत अधिवेशन घेत होती. कुस्तीचा प्रचार व प्रसार व्हावा.

कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळाला एक स्वतंत्र क्रिडा व्यासपीठ तयार व्हावे. तंत्र व डावपेचांची सर्व सामान्य माणसात माहिती व्हावी. महाराष्ट्रातील विविध भागातील कुस्तीला चालना मिळण्यासाठी फिरते अधिवेशन घेण्यात येत होते. किताबाच्या लढतीसाठी महाराष्ट्रातील सर्व पैलवानांचा सहभाग वाढत होता. तालमी - तालमीत स्पर्धा वाढत होती. पैलवानात जिद्द व खिलाडूवृत्ती प्रभावीपणे वाढत होती. महाराष्ट्र केसरी गटात आपल्याच तालमीचा दबदबा रहावा, यासाठी महाराष्ट्रातील तालमी झटत होत्या.

Wrestler Sambhaji Patil
IND vs AUS Test Series : भारतीय संघात होणार मोठा बदल; 37 सामन्यात 3505 धावा करणाऱ्या फलंदाजाचं पदार्पण?

शाहू महाराज स्थापित कोल्हापुरातील श्री. शाहू विजयी गंगावेस तालीम ही नामवंत पैलवान तयार करणारी खाण होती. या तालमीत पहिले दुहेरी महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, दीनानाथसिंह, हरिचंद्र बिराजदार, नारायण हांगे, रावसाहेब मगर, नामदेव मोळे, विष्णू भंडारी या नामवंत पैलवानाची नांदी होती. एका पेक्षा एक सरस, तोडीस तोड वरचढ जोड असे पैलवान होते. वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत होती. सर्वच पैलवान महाराष्ट्र केसरी किताबासाठी धडपडत होते. झगडत होते.

नामवंत पैलवानच्या लढतीवर मोठे होत होते. एकमेकांच्या पक्कडीवर पैलवान दमा, कसाने तयार होत होते. या वर्षी मात्र विष्णू भंडारी व संभाजी पाटील यांना किताब मिळावा यासाठी गंगावेस झटत होती. तालमीतील सर्व पैलवान यांनी दोघांवरच जाणीवपूर्वक लक्ष दिले होते. जाणीवपूर्वक कुस्ती वरचढ पैलवानसोबत पक्कड करण्यात येत होती. सर्वजण या दोघांवर विशेष लक्ष देत होते. चतुर चाणाक्ष तंत्रशुद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्यासोबत सारखी लढत असायची.

त्यांच्याच सोबत मेहनत असायची. त्यावेळी बिराजदार मामा एवढा व्यायाम कोणालाही जमत नव्हता. खूप मोठा व्यायाम व तगडी जोड म्हणून ही मामाची नोंद होती. तरीपण संभाजी पाटील, विष्णू भंडारी हे व्यायाम करण्याचा प्रयत्न करीत होते . यामुळे संभाजी पाटील यांचे शरीर व रेखीव दिसत होते. तब्येत पिळदार व डौलदार झाली होती. अंगात पहाडी ताकद आणि रग आली होती.

व्यायामामुळे संभाजी पाटील यांचे पट (मांड्या) सर्वात देखणे व तगडे होता. त्यावेळेच्या गंगावेस तालीमतील सर्व पैलवान यापैकी सर्वात मोठे पट म्हणून संभा पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. त्या 27 इंच पट होता. वस्ताद पैलवान गणपतराव खेडकर सुद्धा कधीमधी लंगोट लावून आखाड्यात उतरत होते. संभा दमाला पक्का करायचा यासाठी हा अट्टाहास होता. गादीवरील कुस्ती सरावासाठी सर्वजण तयार होत होते.

Wrestler Sambhaji Patil
Union Budget 2023 Sports : क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; मिळणार 3397 कोटी

बीड मुक्कामी होणार्‍या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून गादी विभागातून विभागात संभाजी पाटील - आसगावकर यांची सार्थ निवड झाली होती. संभाजी यांचे गाव पन्हाळा तालुक्यातील आसगाव. कोल्हापूरच्या रांगड्या कुस्ती शौकिनांना संभाजी पाटील यांच्या कडून खूप अपेक्षा होत्या. महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूरकरांची खूप मोठी परंपरा होती, ती कायम ठेवावी एवढीच माफक व निस्वार्थ सोज्वळ प्रमाणिक क्रिडाभावना कोल्हापुरकर व्यक्त करत होते. बीड मुक्कामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मान्यवरांच्या शुभाहस्ते अधिकृतपणे सुरुवात झाली.

लहान वजनी गटातील कुस्त्या संपन्न होत होत्या. अपेक्षित व अनपेक्षित निकाल सुद्धा समोर येत होते. गादी विभागात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूरचे संभाजी पाटील आसगावकर विजयी कुस्त्या करत होते. गादी विभागातील खुल्या गटातील विविध पैलवानांना ते आस्मान दाखवण्यात यशस्वी होत होते. गादी विभागात विजयी घोडदौड चालू होती. गादी विभागातील केसरी वजन गटातील औरंगाबादचे पै.सिकंदर शेख, नगरचे पै.गुंजाळ, पुण्यनगरीचे पैलवान लक्ष्मण शेंडकर यांना उपांत्यफेरीत नमवून गादी गटात अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम फेरीचा सामना मुंबईचे पै.विष्णू भंडारी यांच्यासोबत आला.

गादी विभागातील मुंबई विरुद्ध कोल्हापूर असा अंतिम सामना होता. दोन्ही पैलवान गंगावेस तालमीत होते. सखे, सोबती होते. दोघेही पैलवान एकमेकाचे डाव-प्रतिडाव जाणीवपुर्वक जाणत होते. तरीही खूप कडवी झुंज झाली. झालेल्या कुस्तीत संभाजीराव पाटील कोल्हापूरकर सरस ठरले. मित्रावरच विजय संपादन करून संभा पाटील गादी विभागातील स्पर्धेत अजिंक्य ठरले त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. यासाठी त्यांना सात तगड्या कुस्त्या कराव्या लागल्या. आठवी कुस्ती ही महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत होती.

माती विभागात तगडे पैलवान लाल धुरळा उडवीत होते. लाल वादळांना प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते. चटकदार व रोमहर्षक कुस्त्यांना बक्षिसांचा वर्षाव सुद्धा होत होता. माती विभागात कोल्हापूर संघाकडून सरदार खुशहाल शाहूपुरी तालमीतील पहिलवान होते. रोमहर्षक विजय संपादन करीत सरदार यांनी अंतिम सामन्यात जोरदार मुसंडी मारली होती. मातीतले विजेतेपद त्यांनी पटकावले .

आता बीड मुक्कामी विसाव्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर असा अंतिम सामना रंगणार होता. कडवी झुंज होणार होती. तगडी कुस्ती पाहण्यासाठी क्रिडाशौकिन डोळ्यात प्राण आणून बसले होते. माती मैदान तयार होते. पंच म्हणून ऑलम्पियन मारुती आडकर यांची नेमणुक करण्यात आली. तांत्रिक समिती तयार झाली. परिषदेचे अध्यक्ष महान पैलवान हिंदकेसरी मारुती माने यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ झाला. पैलवानांची हात सलामी झाली. कुस्ती पंढरीचे दोन्ही पैलवान लढण्यास सज्ज झाले. शडुंचा धुत्कार मैदानात घुमत होता. एकमेकांना आव्हान दिले जात होते.

Wrestler Sambhaji Patil
Ranji Trophy: सामना वाचवण्यासाठी कर्णधार एका हातानेच लढला!

दोन्ही पहाडी पैलवान एकमेकांच्यावर आक्रमकमण करू लागले. पै.संभाजी पाटील यांची पट काढणे ही खासियत होती. कुस्ती खडाखडी चालू झाली. डाव-प्रतिडाव चालू झाले. दोन्ही पैलवान आपापल्या ताकदीचे प्रदर्शन करीत होते. प्रेक्षकही तगडी कुस्ती पाहण्यासाठी कान, डोळे कुस्तीकडे लावून बसले होते. तमाम कुस्ती शौकीनांच्या नजरा कुस्तीवर पडत होत्या. धर, पकड, डावकर अशा आरोळ्या कानावर येत होत्या. कुस्तीच्या 17 व्या मिनिटाला पैलवान संभाजी पाटील यांनी पट काढून सरदार खुशहाल यांच्यावर एक गुण घेतला. संभा पाटील यांनी एक गुणाची कमाई केली . कुस्ती चालू होती.

अखेर कुस्तीची निर्धारित 20 मिनिटे संपली. एक गुणाच्या आधारे पैलवान संभाजी पाटील यांना तांत्रिक समितीने विजयी घोषित केले. तसा प्रेक्षकांचा लोंढा मैदानात आला. तिकडे दीनानाथ सिंह आणि बिराजदार मामा यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेजस्वी तेज झळकत होते. तर कृतज्ञता व्यक्त करणारा संभाजी पाटील यांनी तेवढ्याही प्रेक्षकातून वाट काढत आपल्या गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी आला हे विशेष. अशी गुरु - शिष्यांच अनोख नात असणारी गंगावेस तालीम होय . अशाप्रकारे विसावा महाराष्ट्र केसरी पैलवान संभाजी पाटील असगावकर हे महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरले .

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()