Latest Football News: भारतीय क्लब फुटबॉलमध्ये दिग्गज ठरलेले इराणचे जमशिद नासिरी यांचा मुलगा कियान नासिरी याला भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी प्राप्त झाली आहे. आगामी इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेसाठी नवे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी २६ सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला.
भारतीय संघाच्या तयारी शिबिरासाठी निवडलेल्या संभाव्य संघात प्रभावी ठरणारा सेंटर-बॅक खेळाडू संदेश झिंगन याचे नाव नाही. मोहन बागानचा राईट-बॅक खेळाडू आशीष राय व ईस्ट बंगालचा गोलरक्षक प्रभसुखनसिंग गिल यांनाही संभाव्य संघात स्थान मिळाले आहे, ते अजून सीनियर संघातून खेळलेले नाहीत.
भारतीय फुटबॉलमध्ये २३ वर्षीय कियान याला आश्वासक चेहरा मानले जाते. तो कोलकात्यात लहानाचा मोठा झाला. त्याची आई शिलाँग येथील आहे. या मोसमात तो चेन्नईयीन एफसीचे प्रतिनिधित्व करत असून आघाडीफळीत खेळताना त्याने चमक दाखविली आहे. कियानचे वडील जमशिद ईस्ट बंगालतर्फे दिग्गज ठरले, सध्या ते कोलकात्यात राहतात. जमशिद यांनी १९७७ साली फिफा जागतिक युवा स्पर्धेत इराणच्या २० वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
गोलरक्षक ः गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, प्रभसुखनसिंग गिल, बचावपटू ः निखिल पुजारी, राहुल भेके, चिंग्लेन्सानासिंग कोन्शाम, रोशनसिंग नाओरेम, अन्वर अली, जय गुप्ता, आशीष राय, सुभाशीष बोस, मेहताब सिंग, मध्यरक्षक ः सुरेशसिंग वांगजाम, जिक्सन सिंग, नंदकुमार सेकर, नाओरेम महेश सिंग, यासिर महम्मद, लालेन्गमाविया राल्टे, अनिरुद्ध थापा, सहल अब्दुल समद, लाल्लियानझुआला छांगटे, लाल्थाथांगा खॉलरिंग, आघाडीपटू ः कियान नासिरी गिरी, एडमंड लालरिनडिका, मनवीर सिंग, लिस्टन कुलासो.
हैदराबाद येथे तीन देशांची इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धा ३ ते ९ सप्टेंबर या कालावधीत खेळली जाईल. स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ९३व्या स्थानी असलेला सीरिया, १७९व्या क्रमांकावरील मॉरिशस हे संघ खेळणार असून तिसरा संघ भारत फिफाच्या ताज्या मानांकन यादीत १२४व्या स्थानी आहे. ३१ ऑगस्टपासून हैदराबाद येथेच संघाच्या सराव शिबिराला सुरुवात होईल. इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धेची यावेळी चौथी आवृत्ती रंगणार आहे. भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्याविना ही स्पर्धा प्रथमच खेळली जाईल, तर मार्केझ भारताचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने पदार्पण करतील. यापूर्वी भारताने दोन वेळा स्पर्धा जिंकली आहे.
तारीख ३ सप्टेंबर ः भारत विरुद्ध मॉरिशस
तारीख ६ सप्टेंबर ः सीरिया विरुद्ध मॉरिशस
तारीख ९ सप्टेंबर ः भारतीय विरुद्ध सीरिया
सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता
जानेवारीत आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेत सीरियाविरुद्धच्या सामन्यात प्रमुख बचावपटू झिंगन याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो अजून दुखापतीतून पूर्ण सावरलेला नाही. मे महिन्यात झालेल्या फिफा विश्वकरंडक २०२६ पात्रता फेरीत कुवेत आणि कतारविरुद्धच्या सामन्यांनाही झिंगन मुकला होता.
आम्ही दोन वेगवेगळ्या संघांचा सामना करणार असून क्रमवारी फार महत्त्वाची नाही. खेळाडूंचा योग्य गट शोधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे एकाच दिशेने काम करणे आवश्यक असून पूर्वस्थिती खूप चांगली असेल, याची मला पूर्ण खात्री आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.