Table Tennis: पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; तर ऋग्वेद दांडेकरला उपविजेतेपद

Sangli 5th State Ranking Table Tennis Tournament: पुण्याच्या शौरेन सोमण याने १५ व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले, तर ११ वर्षाखालील गटात ऋग्वेद दांडेकर उपविजेता ठरला.
Sangli 5th State Ranking Table Tennis Tournament
Sangli 5th State Ranking Table Tennis TournamentSakal
Updated on

5th State Ranking Table Tennis Tournament: पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या शौरेन सोमण याने १५ व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. तसेच मुलांच्या ११ वर्षाखालील गटात पुण्याच्याच ऋग्वेद दांडेकर याला उपविजेतेपद मिळाले. सांगलीतील नवकृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड एमआयडीसी येथे महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने सूरज फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे ही स्पर्धा खेळवली जात आहे.

मुलांच्या १५ वर्षांखालील गटात पाचव्या मानांकित सोमणने ठाण्याच्या सहाव्या मानांकित प्रतिक तुलसानी याचे आव्हान ९-११,११-६,११-५,११-८ असे मोडून काढले. सोमणने पहिला गेम गमावल्यानंतर टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ करत हा सामना जिंकला.

त्यानंतर त्याने मुलांच्या १७ वर्षांखालील गटात पुण्याच्याच ईशान खांडेकरला पराभूत केले. या गटात नववे मानांकन मिळालेल्या सोमणने दुसऱ्या मानांकित खांडेकरला १४-१२,११-५,११-९ असे पराभूत करताना अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला. सोमण सध्या पुण्याच्या एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून त्याने आत्तापर्यंत जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

Sangli 5th State Ranking Table Tennis Tournament
भारताच्या अहिका-सुतिर्थाने रचला इतिहास; Asian Table Tennis Championships स्पर्धेत जिंकले पहिले दुहेरी पदक

मुलांच्या ११ वर्षाखालील गटात पुण्याच्या ऋग्वेद दांडेकरला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला मुंबईच्या यश कोल्हेने ७-११,११-६,११-५, ११-८ असे पराभूत केले. मुलांच्या १३ वर्षाखालील गटात ठाण्याच्या सातव्या मानांकित प्रतिक तुलसानीने अग्रमानांकित आरव होरा याच्यावर ११-८,११-५,११-४ असा सनसनाटी विजय नोंदवित अजिंक्यपद मिळविले.

मुलींच्या ११ वर्षांखालील ठाण्याची द्वितीय मानांकित खेळाडू जिनया वधानने नाशिकच्या अग्रमानांकित खेळाडू केशिका पूरकर हिच्यावर १३-११,११-४,११-६ अशी अनपेक्षित मात करत विजेतेपदावर नाव कोरले. १३ वर्षाखालील गटात मुंबईच्या टी एस टी संघाची अग्रमानांकित खेळाडू मायरा सांगळेकरने अंतिम सामन्यात आपलीच सहकारी पलक झंवर हिच्यावर ११-१३,११-२,११-३,११-९ असा विजय मिळवत विजेतेपद जिंकले.

मुलींच्या १५ वर्षाखालील गटात ठाण्याच्या तृतीय मानांकित सान्वी पुराणिकने अंतिम सामन्यात आपली सहकारी स्वरा जांगडेवर ४-११,११-६,११-९,११-५ असा विजय मिळविला, तर मुलींच्या १७ वर्षाखालील गटात ठाण्याच्या अग्रमानांकित रितिका माथूरने आपली सहकारी आणि तृतीय मानांकित अन्वी थोरातचा ९-११,६-११,११-८,११-६,११-८ असा पराभव केला आणि विजेतेपद नावावर केले.

Sangli 5th State Ranking Table Tennis Tournament
Table Tennis Tournament : आवेश केवलरामानी यास तिहेरी मुकुट; नाशिक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

मुलांच्या १९ वर्षाखालील गटात मुंबईच्या टी एस टी संघाचा तृतीय मानांकित खेळाडू ध्रुव शहा याने मुंबई महानगर जिल्हा संघाच्या आठवा मानांकित पार्थ मगर याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित त्याच्यावर ११-७,११-३,११-१३,११-१३, ११-४,११-९ असा विजय मिळविला.या सामन्यापूर्वी उपांत्य फेरीत ध्रुवने पुण्याच्या द्वितीय मानांकित नील मुळ्ये याच्याविरुद्ध ११-८,११-९,११-९ असा सहज विजय मिळविला होता तर पार्थने आपला सहकारी सिद्धांत देशपांडेवर ११-३,१२-१४,११-४,११-८ अशी अनपेक्षित मात केली होती.

मुलींच्या १९ वर्षाखालील गटात अंतिम सामन्यात मुंबईच्या टीएसटी संघाची अग्रमानांकित अनन्या चांदे हिने आपलीच सहकारी तृतीय मानांकित श्रावणी लोकेवर मात करच ११-२,११-५,११-७,११-९ असा विजय मिळवला. तिने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. या सामन्यापूर्वी उपांत्य फेरीत अनन्याने ठाण्याच्या पाचवी मानांकित रितिका माथूरचे आव्हान ११-८,११-८,१२-१० असे संपुष्टात आणले होते, तर श्रावणी हिने ठाण्याच्या दहाव्या मानांकित ऋतुजा चिंचासुरेला ७-११, १३-११,११-८, ११-७ असे पराभूत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.