Virat Kohli
Virat Kohliesakal

विराटला एक टेस्ट मॅच खेळवा आणि...दिग्गज क्रिकेटरच्या ट्विटने खळबळ

माजी दिग्गज क्रिकटरने विराटला कसोटी क्रिकेटमधून बाहेर काढण्याचे वक्तव्य केलं.
Published on

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेट कारकिर्दीला ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. विराटचा हा प्रवास यशस्वी राहिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये विराटला क्रिकेटमधून बाहेर काढण्याचे वक्तव्य केलं आहे.

Virat Kohli
विराटला कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण, किंग कोहलीचा खास Video

विराट कोहलीने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सबिना पार्कवर कसोटी पदार्पण केले. 2012 मध्ये कोहली कठीण टप्प्यातून जात होता. त्यानंतर त्याला वगळण्याची मागणी करण्यात आली. या सगळ्या दरम्यान माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही विराटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता मांजरेकर यांचे 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे.

त्यावेळी भारतीय टेस्ट टीममध्ये राहुल द्रविड, वीवीएस लक्ष्मण, विरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यांसारखे दिग्गज खेळाडू खेळत होते. त्यावेळी मांजरेकर यांनी ६ जानेवारी २०१२ ला विराटसंदर्भात एक ट्विट केले होते. ज्यामध्ये मी आता वीवीएस लक्ष्मणला ड्रॉप करणार आणि रोहितला आगामी सामन्यात संधी देणार. दीर्घकालीन योजना पाहता हे योग्य आहे. असे म्हणत, विराटला आणखी एक टेस्ट खेळवा आणि खात्री करा की तो इथे खेळू शकतो का?

Virat Kohli
रोहित विराटवर BCCI संतापली; दिली वॉर्निंग, काय आहे कारण?

विराट कोहलीला 2011 मध्ये पहिल्यांदा व्हाईट जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने भारतासाठी आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीने या कसोटी सामन्यांमध्ये 7 द्विशतके, 27 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 8043 धावा केल्या आहेत. विराट हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()