Sanju Samson Captain Of India-A : भारताचा विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नाही. संजूला डावलल्याने सोशल मीडियावर त्याचे चाहते नाराज झाले. संघ निवड झाल्यापासून संजू सॅमसनचे चाहते सोशल मीडियावर सातत्याने बीसीसीआय आणि टीम इंडिया व्यवस्थापनाला शिव्या देत आहेत. आता संजू सॅमसनला न्यूझीलंड अ संघाविरूद्ध मायदेशात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. तरीही चाहत्यांची नाराजी काही कमी झालेली नाही.
न्यूझीलंड-अ विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शुक्रवारी भारत-अ संघाची घोषणा करण्यात आली. येथे बीसीसीआयने 16 सदस्यीय संघाची कमान संजू सॅमसनकडे सोपवली. याबाबत संजू सॅमसनचे चाहते सोशल मीडियावर सतत प्रतिक्रिया देत आहेत. टीम इंडियातून वगळल्यानंतर संजू सॅमसनला लॉलीपॉप मिळाले आहे असे काहीजण म्हणत आहेत, तर काहीजण रोहित शर्मावर संजू सॅमसनला बाहेर काढण्याचा आरोप करत आहेत.
याच आठवड्यात टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा झाली होती. संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. विशेष म्हणजे निवडसमितीने त्याला स्टँड बायमध्येही जागा दिली नाही. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला होता. त्याचे चाहते त्याला डावलल्याबद्दल खूप नाराज होते. आता संजूला भारतीय अ संघाचे कर्णधारपद दिल्याने त्याच्या चाहत्यांची नाराजी थोडीफार दूर होऊ शकते.
भारतीय अ संघ :
पृथ्वी शॉ, अभिमन्यू इश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (विकेट किपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सने, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.