Sanju Samson : ते तीन - चार महिने... वर्ल्डकप खेळण्याची संधी गमावणारा संजू सॅमसन काय म्हणाला?

Sanju Samson
Sanju Samsonesakal
Updated on

Sanju Samson : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची चौथी वनडे जिंकून मालिका आपल्या नावावर केली. भारताची ही दक्षिण आफ्रिकेतील दुसराच वनडे मालिका विजय होता. या मालिका विजयात संजू सॅमसनच्या शतकाचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे संजूसाठी देखील हे शतक महत्वाचे होते. कारण हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक होते.

Sanju Samson
Ishan Kishan : क्रिकेटमधून ब्रेक... किशनने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचं वैयक्तिक नाही तर मानसिक कारण?

संजू सॅमसनच्या या शतकी खेळीनंतर त्याने गेले तीन - चार महिने त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या किती आव्हानात्मक होते हे सांगितले. संजू म्हणाला की, 'मानसिकदृष्ट्या गेले तीन - चार महिने माझ्यासाठी आव्हानात्मक होते. या सर्वातून गेल्यानंतर इथं येऊन आज जी कामगिरी केली त्यानंतर मला आनंद होत आहे.'

संजू पुढे म्हणाला की, 'आमच्या कुटुंबात मी सर्वात नशीबवान आहे. माझे वडील देखील खेळाडू होते. त्यामुळे तुम्हाला कितीही सेटबॅक बसले तरी त्यातून बाऊन्स बॅक करण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नसतो. तुम्ही स्वतःवर किती काम करू शकता आणि तुम्ही किती ताकदीने पुनरागमन करता हे महत्वाचे असते.

Sanju Samson
India W vs Australia W : भारताची आघाडी दीडशे पार; स्मृती, रिचा, जेमिमा, दीप्तीची शानदार अर्धशतके

शतकी खेळीबद्दल बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, 'खरं सांगायचं तर मी स्कोअरबोर्डकडे पाहतच नव्हतो. मी तिल वर्मासोबत खेळत होतो त्यावेळी मी फक्त चेंडू पाहून त्या प्रमाणे फटके खेळत होतो. मी फक्त प्रोसेस फॉलो केली. एका वेळी एकाच चेंडूचा विचार केला आणि स्कोअर बोर्ड हलता ठेवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.