Sanju Samson : सतत बेंचवर बसवल्या जाणाऱ्या संजूला मिळाली ऑफर; आता आयर्लंडकडून खेळणार?

Sanju Samson Ireland Cricket
Sanju Samson Ireland Cricketesakal
Updated on

Sanju Samson Ireland Cricket : भारतीय संघनिवड गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत आली आहे. या वादाचा केंद्रबिंदू कायम संजू सॅमसनच असतो. संजू सॅमलनला एका सामन्यात संधी दिली जाते तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला बेंचवर बसवले जाते. यामुळेत त्याचे चाहते बीसीसीआयवर प्रचंड नाराज असतात. संजू सॅमसनला न्याय मिळावा आणि त्याला इतरांप्रमाणे संधी मिळावी यासाठी सोशल मीडियावर देखील जोरदार ट्रेंड होत असतात. बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ निवडताना संजूकडे दुर्लक्ष केले. न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला एखादुसरीच संधी मिळाली. तर बांगलादेश दौऱ्यावर त्याला पुन्हा संघातून डावलण्यात आले.

Sanju Samson Ireland Cricket
BAN vs IND 2nd ODI : 4, 4, 6, 1... जखमी वाघ रोहित शेवटपर्यंत लढला मात्र भारत हरला

संजू सॅमसन हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करतोय. त्याने आयपीएल 2022 मध्ये संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवले होते. दरम्यान, भारतीय संघात सातत्याने डावलल्या जाणाऱ्या संजू सॅमसनला आयर्लंड क्रिकेट संघाकडून खेळण्याची ऑफर मिळाली आहे. ही ऑफर खुद्द आयर्लंड क्रिकेटच्या अध्यक्षांनी संजू सॅमसनला दिली.

आयर्लंड क्रिकेट अध्यक्ष म्हणाले की, 'तो जर आमच्या संघाकडून खेळला तर आम्ही त्याला सगळ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवू. तो एक दमदार फलंदाज आहे. अशी प्रतिभा खूप कमी लोकांकडे असते. आम्ही त्याला ऑफर देतो की तू आमच्या देशाच्या संघाकडून खेळ. आमच्या संघाला त्याच्यासारख्या कर्णधार आणि फलंदाजाची गरज आहे. जर भारतीय संघ त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तो आमच्या संघात येऊ शकतो. आम्ही त्याचा आदर करतो आणि आम्ही त्याला सगळे सामने खेळवू.'

Sanju Samson Ireland Cricket
David Warner : स्मिथ कर्णधार होताच डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय; लांबलचक पोस्ट करत म्हणाला...

दरम्यान, आयर्लंडकडून मिळालेल्या या ऑफरबद्दल संजू सॅमसनला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, 'सर्वात प्रथम मी आयर्लंड क्रिकेटच्या अध्यक्षांचे आभार मानतो की त्यांनी माझा विचार केला. मात्र मी नम्रपणे ही ऑफर नाकारतोय. मी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. मी इतर कोणत्याही देशाकडून खेळण्यास उत्सुक नाही. मी याचा विचार देखील करू शकत नाही. मी ही ऑफर स्विकारू शकत नाही. मी आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षांची माफी मागतो.'

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.