Sanju Samson India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना हॅमिल्टन येथील सिडॉन पार्क येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. या सामन्यात संजूच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर संजूनंतर ट्विटरवरचे चाहते चांगलेच संतापले आहेत. संजूच्या हकालपट्टीसाठी त्यांनी टीम इंडिया आणि बीसीसीआय जोरदार निशाणा साधला आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला चांगली कामगिरी करूनही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. संजच्या पहिल्या वनडेत 36 धावांची उपयुक्त खेळीही खेळली. त्याने श्रेयस अय्यरसोबत 80 हून अधिक धावांची भागीदारी केली, ज्याच्या जोरावर भारताला 300 हून अधिक धावा करता आल्या. मात्र या कामगिरीनंतरही त्याला संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय संघाने दुसऱ्या वनडेत संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरवर चाहते संतापले आहे. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की बहिष्कार टाका. बीसीसीआयचा पक्षपातीपणा, इथून पुढे क्रिकेट कधीच पाहणार नाही.
भारतीय संघाने पुन्हा एकदा ऋषभ पंतला एक संधी दिली आहे. ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याला संघातून बाहेर टाकून संजूला संधी देण्याबाबत चाहते सतत बोलत असतात. जर आपण पंतच्या शेवटच्या पाच डावांवर नजर टाकली तर त्याने मागील पाच डावांमध्ये 6, 3, 6, 11, 15 धावा केल्या आहेत. 2022 मधील त्याची टी-20 कामगिरी पाहता त्याने यावर्षी 21 डावांत केवळ 21.21 च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. पंतचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
तर दुसरीकडे संजू सॅमसनने मागील 4 एकदिवसीय डावात 86*, 30*, 2*, 36 धावा केल्या आहेत. म्हणजे 3 वेळा नाबाद आणि एक अर्धशतक खेळी समाविष्ट आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.