Sanju Samson T20 World Cup : दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच झाली आहे. या संघात अनेक खेळाडूंनी पुनरागमन केलं आहे. मात्र आश्चर्यकारकरित्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे नाव त्यात नाहीये. त्यामुळे त्याचा सहा महिन्यांनी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघ व्यवस्थापन विचार करत नाहीये का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्यावेळी भारतात वनडे वर्ल्डकप होता त्यावेळी संजूची टी 20 संघात निवड व्हायची आता टी 20 वर्ल्डकप जवळ आला आहे तर टी 20 संघात सोडून त्याची वनडे संघात निवड झाली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप बरोबरच टी 20 वर्ल्डकपसाठी देखील संजूचा विचार होणार नाही अशी शक्यता बोलून दाखवण्यात येत आहे.
संजू सॅमसनला गेल्या काही मालिका आणि मोठ्या स्पर्धांवेळी भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील संघ निवडीवेळी त्याने बाजी मारली. त्याची वनडे संघात निवड झाली असून तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारताकडून शेवटचा वनडे सामने खेळला होता. मात्र जरी संजूची संघात निवड झाली असली तरी त्याच्यासाठी कही खुशी कही गम अशी स्थिती आहे.
वेस्ट इंडीजमध्ये होणारा टी 20 वर्ल्डकप अवघ्या सहा ते सात महिन्यांवर आला आहे. भारतीय संघव्यवस्थापन टी 20 च्या संघबांधणीला लागली आहे. इतका कमी वेळ राहिला असताना बीसीसीआयच्या निवडसमितीने टी 20 साठी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. टी 20 वर्ल्डकपपूर्वी भारत फक्त 8 टी 20 सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय टी 20 संघात निवड न होणं संजूसाठी चांगलं नाही.
संजूकडे टी 20 साठी जरी दुर्लक्ष केलं असलं तरी त्याची वनडे संघात निवड झाली आहे. तिथे चांगली कामगिरी करून आयपीएल 2024 मध्ये आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखवलं तर संजूचा पुन्हा टी 20 वर्ल्डकपसाठी विचार होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.