WI vs IND : संजू फेल तर सूर्याही उगवण्यापूर्वीच मावळला! भारताच्या तळातील फलंदाजांनी लाज वाचवली

WI vs IND : संजू फेल तर सूर्याही उगवण्यापूर्वीच मावळला! भारताच्या तळातील फलंदाजांनी लाज वाचवली
Updated on

West Indies Vs India 2nd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या विंडीजने भारताचा पहिला डाव 181 धावात गुंडाळला. भारताच्या तळातील फलंदजांनी हातभार लावला म्हणून भारत 150 धाावा पार करून शकला. भारत आजच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माविना मैदानावर उतरला होता.

मात्र आव्हानात्मक खेळपट्टीवर भारतीय संघाला या दोघा अनुभवी फलंदाजांची कमतरचा नक्कीच जाणवली. भारताकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 55 धावांचे योगदान दिले. तर शुभमन गिलने 34 धावा केल्या. या दोघांनी 90 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली.

बऱ्याच काळानंतर संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र तोही 9 धावांची भर घालून परतला. इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. विंडीजकडून शेफर्ड, गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

WI vs IND : संजू फेल तर सूर्याही उगवण्यापूर्वीच मावळला! भारताच्या तळातील फलंदाजांनी लाज वाचवली
Ishan Kishan WI vs IND : अथनाजेनं असं काही केलं की इशान किशनचा चेहराच पडला; Photo व्हायरल

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून यजमानांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या इशान किशन आणि शुभमन गिल या भारताच्या सलामी जोडीने 90 धावांची सलामी दिली.

इशान किशनने आक्रमकपणे फलंदाजी करत पहिल्या वनडेप्रमाणे दुसऱ्याही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. मात्र ही जोडी मोतियेने फोडली. त्याने 34 धावांवर शुभमन गिलला बाद केले.

यानंतर आलेल्या संजूने सावध सुरूवात करण्यास सुरूवात केली. मात्र दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजी करणारा इशान किशन 55 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. यामुळे सेट झालेले दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले.

या दोघांच्या विकेटनंतर भारताची मधली फळी ढेपाळली. शेफर्डने किशन पाठोपाठ अक्षर पटेलला 1 धावेवर माघारी धाडले. यानंतर आलेला कर्णधार हार्दिक पांड्या 7 धावांची भर घालून परतला.

WI vs IND : संजू फेल तर सूर्याही उगवण्यापूर्वीच मावळला! भारताच्या तळातील फलंदाजांनी लाज वाचवली
T20 World Cup 2024 : राहुल - मोदी अन् जय शहा... टी 20 वर्ल्डकपची तारीख जाहीर झाली अन् बीसीसीआयचं टेन्शन का वाढलं?

सर्वांची नजर आता संजू सॅमसनकडे होती. मात्र फिरकीपटू यानिक करिहने त्याला आपल्या फिरकीने चकवले. भारताची अवस्था बिनबाद 90 वरून 5 बाद 113 धावा अशी झाली. भारताचा निम्मा संघ गारद झाला त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला.

यानंतर रविंद्र जडेजा (10) आणि सूर्यकुमार यादव (24) यांनी 33 धावांची भागीदारी रचत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र गुडाकेश आणि शेफर्ड यांनी या दोघांनाही चालते केले.

भारताच्या सात विकेट्स 150 च्या आत गेल्यानंतर शार्दुल ठाकूरने 16 धावांची खेळी करत भारताला थोड्याफार सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहचवले. कुलदीपने नाबाद 8 धावा केल्या तर मुकेशने 6 धावांचे योगदान देत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले.

विंडीजकडून शेफर्ड, गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.