Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

sarbjot singh
Shooting World Cupesakal
Updated on

Shooting World Cup ­­: भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधला. त्याने म्युनिच येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्‍वकरंडकातील पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

sarbjot singh
Sunil Chhetri : एक पर्व संपलं! सुनिल छेत्रीच्या डोळ्यात तरळले अश्रू; सामना राहिला 0-0 बरोबरीत

सरबज्योत सिंगने दहा मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या पात्रता फेरीत ५८८ गुणांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले होते. त्यामुळे मुख्य फेरीत त्याच्याकडून पदक जिंकण्याची आशा उंचावली होती. गुरुवारी झालेल्या मुख्य फेरीत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. सरबज्योत याने २४२.७ गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर हक्क सांगितला.

sarbjot singh
Hardik Pandya : साठीतल्या हार्दिकपेक्षा... पांड्यानं सांगितलं नकारात्मक वातावरण कसं फिरवलं

भारताच्या सरबज्योत सिंगने पुरुषांच्या प्रकारात पहिला क्रमांक पटकावला. चीनच्या बू शूहँग याचे ०.२ गुणांनी पहिला क्रमांक हुकला. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या रॉबिन वॉल्टर याने ब्राँझपदकाची कमाई केली.

(Sports News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.