Sarfaraz Ahmed : चेष्टा करा पण सर्फराजची कुठं! तो आला.. त्यानं पाहिलं अन् त्यानंच लढून वाचवली लाज

Sarfaraz Ahmed Century Pakistan Vs New Zealand 2nd Test Day 5
Sarfaraz Ahmed Century Pakistan Vs New Zealand 2nd Test Day 5 esakal
Updated on

Sarfaraz Ahmed Century Pakistan Vs New Zealand 2nd Test Day 5 : कधी इंग्रजी कच्चं म्हणून हिनवला गेलेला, वयाची तिशी उलटली तरी नाकात बोटं घालणारा, कर्णधार असूनही स्वतःच जांभया देणारा सर्फराज गेल्या काही काळापासून सर्वांच्याच विस्मृतीत गेला होता. पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळातून मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम एवढंच सर्वांना ऐकू येत होतं. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सत्तांतर झालं अन् जुन्या खोडांना नव्याने पालवी फुटली.

Sarfaraz Ahmed Century Pakistan Vs New Zealand 2nd Test Day 5
Arshdeep Singh No Ball : कारकिर्दित 0 नो बॉल! अर्शदीपनं या 5 गोलंदाजांकडून शिकावं

अशीच नवी पालवी फटुलेलं खोड म्हणजे सर्फराज अहमद! कधीकाळी पाकिस्तान संघात सर्फराज म्हणेल ती पूर्व दिशा होती. मात्र काळाच्या ओघात सर्फराज म्हणजे अडगळीची जागा झाला होता. मात्र या अगडळीतील इसमानेच पाकिस्तानची लाज वाचवण्यासाठी जीव तोडून लढला. सर्फराज अहदमने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी शतकी खेळी केली. ही काही साधारण शतकी खेळी नव्हती तर या शतकी खेळीने पाकिस्तानची लाज त्यांच्यात देशाच्या वेशीवर टांगली जाण्यापासून वाचवली.

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. तर मालिकेतील शेवटची दुसरी कसोटी चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या कब्जात होती. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 319 धावांचे आव्हान न्यूझीलंडने ठेवले होते. चौथ्याच दिवशी न्यूझीलंडने पाकिस्तानचे दोन फलंदाज तीन षटकात शुन्यावर माघारी धाडले.

चौथ्या दिवशी एकही धाव न करत दोन शिलेदार गमावणाऱ्या पाकिस्तानसाठी पाचव्या दिवशीचे पहिले सत्र देखील फारसे काही चांगले राहिले नाही. त्यांची अवस्था 5 बाद 80 धावा अशी झाली होती. सामना न्यूझीलंडच्या खिशात जवळपास पोहचला होता. पाकिस्तान मायदेशात सलग दुसरी कसोटी मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा होता.

मात्र अनुभवी झुंजार सर्फराजने पाकिस्तानची लाज वाचवण्यासाठी कंबर कसली. त्याने सौद शकीलसोबत सहाव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. मात्र 146 चेंडू खेळून 32 धावांचे योगदान देत सौद बाद झाला. त्यानंतर सर्फराज अहमदने आगा सलमानसोबत सातव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. (Sports Latest News)

Sarfaraz Ahmed Century Pakistan Vs New Zealand 2nd Test Day 5
Jay Shah Najam Sethi : करारा जवाब! पंगा घेणाऱ्या पाक बोर्डाच्या अध्यक्षांची ACC नेच केली बोलती बंद

या भागीदाऱ्या रचताना सर्फराजचा शंभर कधी होऊन गेला कळलेच नाही. सर्फराजने झुंजार शतक ठोकले होते. त्याने अजून आपल्यात क्रिकेट आणि झुंजारपणा बाकी असल्याचे दाखवून दिले होते. मात्र त्याला सामना आता टप्प्यात वाटत होता. आगा सलामान 40 चेंडूत 30 धावा करत बाद झाला. मात्र सर्फराज अजूनही लढत होता.

पाकिस्तानला शेवटच्या 10 षटकात विजयासाठी 40 धावांची गरज होती. मात्र हातात विकेट्स खूपच कमी शिल्लक होत्या. तरी सर्फराजच्या रूपानं पाकिस्तानसाठी एक आशा जीवंत होती. दुसरीकडे किवी उरलेल्या दोन विकेट्स घेऊन सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. यातच मिचेल बार्सवेलने अहमदला 118 धावांवर बाद केलं अन् विजयातील अडसर दूर केला.

Sarfaraz Ahmed Century Pakistan Vs New Zealand 2nd Test Day 5
Virat Kohli : विराट जिथे नतमस्तक झालाय 'त्या' बाबांपुढे खुद्द स्टीव्ह जॉब्ज देखील डोके टेकायचा

आता न्यूझीलंडला विजयासाठी एक विकेट तर पाकिस्तानला सामना वाचवण्यासाठी 6 षटके खेळून काढायची होती. नसीम शाह आणि अब्रार ही शेवटची जोडी किल्ला लढवत होती. कर्णधार टीम साऊदीने सर्व खेळाडू फलंदाजाच्या अवती भवतीच सजवले. याचा फायदा उचलत नसीम शाहने संधी मिळताच फटकेबाजी करत न्यूझीलंडवर दबाव टाकला.

विजयासाठी आता फक्त 15 धावांची गरज होती. मात्र अखेर बॅड लाईटमुळे खेळ थांंबवला आणि पाकिस्तानने सामना वाचवला. याचबरोबर मालिका ० - ० अशी बरोबरीत सोडवली. नसीम शाहने नाबाद 15 धावा केल्या. मात्र सामन्याचा खरा हिरो 35 वर्षाचा सर्फराज ठरला. जरी पाकिस्तान सामना जिंकली नसली तरी त्याच्यासाठी हा अनिर्णित सामना विजयापेक्षाही मोठा होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()