Ranji Trophy : मुंबईला कोणी वाली आहे की नाही; सर्फराजनं अजून किती शतकं ठोकायची?

Sarfaraz Khan Ranji Trophy Century
Sarfaraz Khan Ranji Trophy Century esakal
Updated on

Sarfaraz Khan Ranji Trophy Century : भारताच्या वरिष्ठ संघात सध्या उलाथापालथ सुरू आहे. नवे खेळाडू घेऊन नवे कॉम्बिनेशन सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे अनेक दिवस रांगेत असलेल्या नव्या खेळाडूंना जुन्या खेळाडूंच्या जागी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक खेळाडूंच नशीब देखील उघडले आहे. मात्र मुंबईच्या दोन खेळाडूंकडे बीसीसीआय आणि निवडसमिती दुर्लक्ष करत आहे. यातील एक आहे पृथ्वी शॉ तर दुसरा आहे सर्फराज खान.

Sarfaraz Khan Ranji Trophy Century
IPL Mandira Bedi : मंदिरा बेदी परतणार! गुणवान खेळाडूंना 'क्रिकेट का तिकीट' देणार

पृथ्वी शॉला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला ड्रॉप करण्यात आले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आपल्या कमबॅकसाठी जोरदार दावेदारी सादर करतोय. मात्र त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची दारे पुन्हा काही केल्या उघडत नाहीयेत.

दुसऱ्या बाजूला आहे सर्फराज खान! सर्फराजने तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळेल त्यावेळी धावांचा पाऊसच पाडला आहे. आताही त्याने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूविरूद्ध ग्रुप B च्या एका सामन्यात 220 चेंडूत 19 चौकार आणि एक षटकार मारत 162 धावा चोपल्या. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा सर्फराज खान ट्रेंड होऊ लागला. सर्फराजला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात यावे. त्याने ही संधी कमावली असल्याचा सूर नेटकऱ्यांनी लावला आहे.

Sarfaraz Khan Ranji Trophy Century
BCCI New Selection Committee : BCCI चा यू टर्न! चेतन शर्मांसाठी व्यंकटेश प्रसादला का डावलले?

याचबरोबर वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी देखील सर्फराज खानसाठी ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'सर्फराज खानने पुन्हा मुंबईसाठी शतकी खेळी केली. यावेळी त्याने लो स्कोरिंग सामन्यात ही खेळी केली आहे. इतर कोणताही फलंदाज त्याच्याइतक्या धावांच्या जवळपासही पोहचलेला नाही. त्याची सरासरी ब्रॅडमनसारखी 77 प्लस आहे. त्याने 34 सामन्यात 12 शतके ठोकली आहेत. त्याला भारतीय कसोटी संघात स्थान न देणे शुद्ध वेडेपणा आहे. विशेषकरून तो फिरकीविरूद्ध चांगला खेळत असून!' (Sports Latest News)

भारतीय संघात अनेक नवख्या खेळाडूंना संधी मिळत आहे. मात्र मुंबईच्या या दोन गुणवान आणि दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सातत्याने डावलण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.