Sarfaraz Khan In Ind Vs Eng : मुंबईचा फलंदाज सरफराज खान याला अखेर भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं आहे. खूप दिवसांपासून तो भारतीय संघात खेळण्यासाठी संधीची वाट पाहात होता. डावखुरा फलंदाज सरफराज याला इंग्लडविरोधातील दुसऱ्या कोसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. तो दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी खेळणार आहे.
सरफराजने डिसेंबर 2014 मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. सरफराजची गेल्या काही वर्षांतील कामगिरी पाहाता त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. आता राहुलच्या दुखापतीमुळे सरफराजचे नशीब चमकले आहे. सरफराज मुंबईसाठी मधल्या फळीत फलंदाजी करतो. अलीकडे केएल राहुल हा देखील भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये मधल्या फळीत खेळत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. तर हैदराबादमध्ये झालेला सामना टीम इंडियाने 28 धावांनी गमावला होता.त्यामुळे भारतीय संघ सघ्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.
आता या दुसऱ्या कसोटी समान्यात सरफराजला पदार्पणाची संधी मिळते की नाही हे पाहणे बाकी आहे, कारण संघात आणखी एक मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदार आहे. तो देखील आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची वाट पाहत आहे.
सरफराजचं रेकॉर्ड कसं आहे?
सरफराज 2020 पासून सातत्याने संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. 2022-23 च्या हंगामात, सरफराजने सहा सामन्यांमध्ये 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. त्याच वेळी, 2021-22 हंगामातील सहा सामन्यांमध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या, ज्यात चार शतकांचा समावेश आहे.
2019-20 या हंगामात, सरफराजने मुंबईसाठी सहा सामन्यांत 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या, ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. सरफराजने एकूण 10 शतके झळकावली आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2466 धावा आहेत, हा एक मोठा विक्रम आहे.
सरफराजची एकूण कारकीर्द
सरफराजने आतापर्यंत 45 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 66 डावात 3912 धावा केल्या आहेत. सरफराजची सरासरी 69.85 आहे. त्याने 14 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत. सरफराजच्या नावावर त्रिशतक देखील आहे. नाबाद 301 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.