Saurashtra Won Vijay Hazare Trophy 2022 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने महाराष्ट्रचा 5 विकेट्स राखून पारभव करत विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरले. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 9 बाद 248 धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 108 धावांच्या शतकी खेळीचे मोठे योगदान होते. मात्र सौराष्ट्रने हे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 46.3 षटकातच पार केले. सौराष्ट्रकडून शेल्डन जॅक्सनने 133 धावांची नाबाद खेळी केली.
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा होता. तो कौल सौराष्ट्रच्या बाजूने लागला. स्वाभाविकपणे सौराष्ट्रने प्रथम महाराष्ट्राला फलंदाजीसाठी पाचारण केले. सकाळच्या वेळी चेंडू स्विंग होत असताना महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सावध सुरूवात केली. मात्र त्यानंतर त्याने धावांची गती वाढवत संघाला 200 च्या जवळ पोहचवले. ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी केली.
दरम्यान, ऋतुराजला सत्यजीत बच्छावने (27), अझीम काझी (37) आणि नौशादने (31) धावा करत त्याला चांगली साथ दिली. महाराष्ट्राने 50 षटकात 9 बाद 248 धावांपर्यंत मजल मारली. सौराष्ट्रकडून चिराग जानीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
महाराष्ट्राने ठेवलेल्या 249 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सौराष्ट्रने फलंदाजीला पोषक झालेल्या विकेटवर 125 धावांची दमदार सलामी दिली. सलामीवीर हार्विक देसाईने अर्धशतकी खेळी केली. तो बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर शेल्डन जॅक्सनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दरम्यान, महाराष्ट्राने सौराष्ट्रला काही धक्के देत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेल्डन जॅक्सनने शेवटपर्यंत किल्ला लढवत सौराष्ट्रचा विजय निश्चित केला. त्याने 136 चेंडूत 133 धावांची नाबाद खेळी केली. महाराष्ट्राकडून विकी ओसवाल आणि मुकेश चौधरीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत लढत देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.