CWG 2022 : स्क्वाशमध्ये सौरभने इतिहास रचला! जिंकले पहिले वहिले कांस्य

Saurav Ghosal Won First Ever Bronze Medal In Squash In commonwealth Games 2022 Birmingham
Saurav Ghosal Won First Ever Bronze Medal In Squash In commonwealth Games 2022 Birmingham esakal
Updated on

commonwealth Games 2022 Birmingham : स्क्वाशमध्ये भारताच्या सौरभ घोसालने (Saurav Ghosal) इतिहास रचला. त्याने भारताला राष्ट्रकुलमधील पहिले वहिले पदक जिंकून दिले. सौरभ घोसालने इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रॉपचा 3 - 0 असा पराभव केला. भारताला स्क्वाशमध्ये (Squash) यापूर्वी एकेरीत एकदाही पदक मिळाले नव्हते. मात्र सौरभने भारताला स्क्वाशमधील पहिले पदक जिंकून दिले. त्याने कांस्य पदकाला (Bronze Medal) गवसणी घातली.

Saurav Ghosal Won First Ever Bronze Medal In Squash In commonwealth Games 2022 Birmingham
CWG 2022 INDW vs BAW Live : रेणुका सिंह ठाकूरचा भेदक मारा; बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव

सौरभने जेम्स विरूद्धचा पहिला गेम 11-6 असा सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही सौरभने आपला दबदबा कायम राखत गेम 11-1 अशा मोठ्या फरकाने जिंकत 2 - 0 अशी आघाडी घेतली. मॅच गेममध्ये त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत गेम 11-4 असा जिंकला. याचबरोबर त्याने भारताच्या पहिल्या पदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे जेम्स हा कधी काळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. सौरभने त्याचाच दारूण पराभव करत इतिहास रचला.

Saurav Ghosal Won First Ever Bronze Medal In Squash In commonwealth Games 2022 Birmingham
PHOTO'S | CWG 2022 : वडिलांच्या हत्येतून सावरत तुलिका मानने रौप्य पदक केले पक्के

दरम्यान, सौरभ घोसालने स्क्वाशमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'सौरभ घोसालला यशाची नवी शिखरे पार करताना पाहून आनंद झाला. त्याने बर्मिंगहममध्ये जिंकलेले कांस्य पदक खास आहे. या पदकासाठी त्याचे अभिनंदन. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय तरूणांमध्ये स्क्वाश खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत मिळेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.