Schoolympics 2023 : स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत आरएमडी, ब्लू रिज, ऑर्किडची घोडदौड

Schoolympics 2023 : स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत आरएमडी, ब्लू रिज, ऑर्किडची घोडदौड
Updated on

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी बाणेर येथील ऑर्किडचा रायन शहाने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत ८ धावांमध्ये ४ विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.शिरूर आरएमडीचा झीशान सय्यद,सिंहगड सिटीचा अमेय वीर, केशवनगर येथील ऑर्बीसचा तरण वाघरे यांनी चौफेर फटकेबाजी करत आपापल्या संघांना विजय मिळवून दिले. स्पर्धेचे सामने फर्ग्युसन कॉलेज आणि सनराईज क्रिकेट ॲकॅडमी, सहकारनगर येथे सुरू आहेत.

संक्षिप्त धावफलक :

ऑर्किड, बाणेर : १० षटकांत ४ बाद ८३ (आर्यन डागा नाबाद ३३, रोनीत मुथा २६, रितेश राजहंस २-१३) २८ धावांनी विवि अग्रसेन हायस्कूल, येरवडा : १० षटकांत ७ बाद ५५ (श्रीराज टिंगरे नाबाद १२, तन्मय तडके ८, रायन शहा ४-८)

सामनावीर : रायन शहा

सिंहगड सिटी : १० षटकांत ९ बाद ८४ (अमेय वीर ३२, ऋतुराज शेवाळे २२, सोफियान खान ३-१६, अखिलेश मोरे २-१५) १९ धावांनी विवि ग्रीनवुड्स : १० षटकांत ८ बाद ६५ (तन्मय तडके २२, राज शिंदे ९, आर्यन निकम ३-११)

सामनावीर : अमेय वीर

ऑर्बिस, केशवनगर : १० षटकांत ३ बाद ८७ (तरण वाघरे ३३, संजीत लाहिरी नाबाद २१, श्रेयश सानप १-९) ६ धावांनी विवि व्हिबग्योर, हिंजवडी : १० षटकांत ५-८२ (श्रेयस सानप ३१, ऋषी वासा १७, आयुष कुंभार २-१७)

सामनावीर : तरण वाघरे

आरएमडी, शिरूर : ८ षटकांत बिनबाद ११२ (झीशान सय्यद नाबाद ४३, शिवम रजक नाबाद ३५) ५८ धावांनी विवि ऑक्सफर्ड वर्ल्ड, वाघोली : ८ षटकांत ३ बाद ५५ (कवीश बोसे १८, विहान जाधव नाबाद १४, आर्यन सिंग २-१८)

सामनावीर : झीशान सय्यद

ब्लू रीज, हिंजवडी : १० षटकांत ६ बाद ८९ (सिद्धार्थ आठल्ये नाबाद २८, रूद्र पाटील २४, आरव अगरवाल १५, शौर्य वडनेरे २-१६) २७ धावांनी विवि पोदार, आंबेगाव : १० षटकांत २ बाद ६२ (अर्णव प्रजापती २२, रोहन गुरव २०, आरव अगरवाल १-७)

सामनावीर : सिद्धार्थ आठल्ये

लोकसेवा, पाषाण : १० षटकांत ५ बाद ८४ (ध्रुव कामत ३०, ऋग्वेद रेगे १८, ऋतुराज कामठे २-८) २७ धावांनी विवि एंजल हायस्कूल, लोणी काळभोर : १० षटकांत ४ बाद ५७ (सोहम श्रीखंडे २१, श्लोक नवगिरे २७, चैतन्य कोरटकर १-२)

सामनावीर : ध्रुव कामत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.