Schoolympics 2023 : तिरंदाजीत अखेरच्या दिवशी गोखळीच्या गुरुकुल विद्यामंदीरने पटकावले पाच पदक

Schoolympics 2023 : तिरंदाजीत अखेरच्या दिवशी गोखळीच्या गुरुकुल विद्यामंदीरने पटकावले पाच पदक
Updated on

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : इंदापूरजवळील गोखळी येथील गुरुकुल विद्यामंदिरने स्कूलिंपिकच्या तिरंदाजीत अखेरच्या दिवशी पाच पदकांची कमाई केली.

कोथरूडमधील फोकस आर्चरी अॅकॅडमीच्या रेंजवर ही स्पर्धा पार पडली. सिद्धार्थ तिकोने आणि पार्थ नरूटे यांनी प्रत्येकी दोन, विश्वजीत भिसे याने एक पदक जिंकले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ ऑलिंपिक शिबीरात सक्रिय राहिलेले एनआयएस प्रशिक्षक समीर म्हस्के, इंदापूरच्या रोशन अॅकॅडमीचे जुबेर पठाण, प्रशिक्षक शशांक चुटके यांच्या हस्ते झाला.

सविस्तर निकाल ः १४ ते १६ वर्षे वयोगट - प्रकार ः इंडियन बो ४० मीटर - मुले ः सुवर्ण ः सिद्धार्थ तिकोने (३०५ गुण, गुरुकुल विद्यामंदीर, गोखळी), रौप्य ः पार्थ नरूटे (२९६, गुरुकुल विद्यामंदीर, गोखळी), ब्राँझ ः अनुप शिंदे (२८७, घुले विद्यालय, मांजरी). मुली ः सुवर्ण ः ऊर्जा सोनार (२४१, दस्तूर, कॅम्प), रौप्य ः गर्विता मिगलानी (१२९, दिल्ली पब्लिक, कोंढवा), ब्राँझ ः प्राची शिवणे (७८, दस्तूर, कॅम्प)

प्रकार ः इंडियन बो ३० मीटर

मुले ः सुवर्ण ः विश्वजीत भिसे (२८८, गुरुकुल, गोखळी), रौप्य ः सिद्धार्थ तिकोने (२८२, गुरुकुल विद्यामंदिर, गोखळी), ३) पार्थ नरुटे (२७०, गुरुकुल विद्यामंदिर, गोखळी). मुली ः सुवर्ण ः समृद्धी तायडे (२७५, सिंहगड स्प्रींगडेल पब्लिक, वडगाव बुद्रूक), रौप्य ः ऊर्जा सोनार (२०१, दस्तूर, कॅम्प), ब्राँझ ः सिद्धी हजगुडे (१९४, लेक्सिकन इंटरनॅशनल, वाघोली)

प्रकार ः रिकर्व्ह बो ३० मीटर

मुले ः सुवर्ण ः सोहम कानसे (३४१, ज्युडसन, पिंपरी), रौप्य ः पार्थ झगडे (३१३, डॉ. कदम गुरुकुल, इंदापूर), ३) आयुष शिळीमकर (३०९, पोदार इंटरनॅशनल, आंबेगाव). मुली ः सुवर्ण ः ध्रिती दुधेडिया (३१९, दिल्ली पब्लिक, कोंढवा), रौप्य ः उर्वी राणे (३०८, सेंट अॅन्स, कॅम्प), ब्राँझ ः राधिका औंधकर (३०३, भारती विद्यापीठ, धनकवडी)

प्रकार ः रिकर्व्ह बो ५० मीटर

मुले ः सुवर्ण ः सोहम कानसे (३३२, ज्युडसन, पिंपरी), रौप्य ः श्लोक पवार (३१४, पायोनियर पब्लिक, मांजरी), ब्राँझ ः अजितेश जायदे (३०१, गोळवलकर). मुली ः सुवर्ण ः वैष्णवी पवार (३१३, श्रीचक्रधर स्वामी माध्यमिक, आंबेगाव बुद्रूक), रौप्य ः ध्रिती दुधेडिया (३०८, दिल्ली पब्लिक, कोंढवा), ब्राँझ ः ऊर्वी राणे (३०३, सेंट अॅन्स, कॅम्प)

प्रकार ः कंपाउंड बो ५० मीटर

मुले ः सुवर्ण ः अमेय पवार (३२७, डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक, पिंपरी), रौप्य ः रुजल महाकालकर (२५१, विखे पाटील मेमोरियल). मुली ः सुवर्ण ः प्रिथीका प्रदीप (३३९, एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड), रौप्य ः ओवी ढोरे (३२५, आदित्य इंग्लिश, बाणेर), ३) तनिष्का सुराम (३२३, व्हीजन, नऱ्हे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.