कोल्हापूर - विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्न लागणार मार्गी

कामातील त्रुटींमुळे हे संकुल खऱ्या अर्थाने सुसज्ज होण्यासाठी प्लॅन बी तयार केला जात आहे.
कोल्हापूर - विभागीय क्रीडा संकुलाचा 
प्रश्न लागणार मार्गी
Updated on

कोल्हापूर : दीर्घलकालीन चर्चेच्या आणि असुविधांच्या केंद्रस्थानी असणारे येथील विभागीय क्रीडा संकुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. पूर्ण झालेल्या कामासोबतच समस्या निर्माण झालेल्या कामासाठी ‘प्लॅन बी’ तयार करण्यात येत असून लवकरच याला मूर्त स्वरूप समोर येणार आहे.

२००९ ला मोकळ्या माळावर केलेल्या पायाभरणीनंतर आज १२ वर्षांत विविध कारणांनी चर्चेत असणारे विभागीय क्रीडा संकुल आता सुसज्ज होणार आहे. कामातील त्रुटींमुळे हे संकुल खऱ्या अर्थाने सुसज्ज होण्यासाठी प्लॅन बी तयार केला जात आहे. या प्लॅननुसार कमीत कमी खर्चात अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

कोल्हापूर - विभागीय क्रीडा संकुलाचा 
प्रश्न लागणार मार्गी
जनमानसांत 'दै. सकाळ'चे स्थान बळकट : श्रीमंत शाहू छत्रपती

सर्वाधिक फसलेला प्रयत्न म्हणून ओळखले जाणारे जलतरण तलाव आहे. या जागीच कोणत्या त्रुटीशिवाय सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यापूर्वी शक्यता पडताळल्या जाणार आहेत. हा प्रयत्न यशस्वी होत असल्यास या तलावासाठीचा खर्च कमी होणार आहे. तर उर्वरित जागेवर इनडोअर स्टेडियमसह सुसज्ज असे होस्टेल बनवण्यात येईल. शूटिंग रेंजचा विकास करून डिजिटल टार्गेटची मंजुरी घेतली आहे. या ठिकाणी असणाऱ्या १० मीटर इनडोअर, २५ मीटर आऊट डोअर, ५० मीटर इनडोअर, ५० मीटर आउटडोअर शूटिंग रेंज अद्यावत करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष टार्गेट तर विंड मीटर, डिजिटल पॉईंट सिस्टीमसह कॅमेरा लावण्यात येतील.

"नवनिर्मितीत अडचणी येतात मात्र त्यावर मात करून मार्ग काढू. हे संकुल सुसज्ज करून या संकुलावर राज्य, राष्ट्रीय स्पर्धा व्हाव्यात हा हेतू आहे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार आहे."

- संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक

कोल्हापूर - विभागीय क्रीडा संकुलाचा 
प्रश्न लागणार मार्गी
Good News - राज्यात ‘ई-पीक’ पाहणी; सातबारावर ॲपद्वारे होणार नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.