नाशिकच्या ईश्वरी सावकारची मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू येथे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी १ ऑगस्ट पासून महिनाभराचे हे शिबीर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - १९ वर्षांखालील वयोगटात संभाव्य निवडक गुणी खेळाडूंना २०२३ साली साऊथ आफ्रिकेत होणार्या पहिल्या विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करत आहे. ईश्वरी सावकारची यापूर्वी मे-जून मधील राजकोट येथे झालेल्या शिबीरासाठी निवड झाली होती. या शिबिरातून बीसीसीआयने सहा संघ तयार केले होते. त्यांच्यात विजयवाडा येथे झालेल्या सामन्यांत ईश्वरीने दोन नाबाद शतक व दोन अर्धशतकांसह सर्वाधिक ५०९ धावा केल्या. याबरोबरच गेल्या हंगामातील विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे या अतिशय महत्वाच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड झाली आहे.
सलामीवीर ईश्वरी सावकार ने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा असे , जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती . तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी च्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ह्या जोरावर ईश्वरीची एप्रिल महिन्यात पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती. या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.