Para Olympic च्या आखाड्यात माणदेशातील दोन रत्ने; गोळाफेकीत सचिन खिलारी, तर बॅडमिंटनमध्ये सुकांत कदम सहभागी होणार

सचिनचा बालपणी अपघात झाल्याने एका हाताला अपंगत्व आले. तो गोळाफेकीत सहभागी होणार आहे.
Para Olympic
Para Olympic esakal
Updated on
Summary

करगणीचा सचिन सर्जेराव खिलारी गोळाफेकीत, तर दुसरा कौठुळीचा सुकांत इंद्रजित कदम बॅडमिंटनमध्ये सहभागी होणार आहे.

आटपाडी : पॅरिस येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिंपिकच्या (Para Olympics) आखाड्यात माणदेशातील आटपाडीच्या मातीत घडलेले सचिन सर्जेराव खिलारी आणि सुकांत इंद्रजित कदम उतरणार आहेत. राज्यातून पॅरा ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या १२ खेळाडूंत आटपाडीच्या या दोघांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत दोघेही अव्वल स्थानी असल्याने त्यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. पदक मिळवण्याचा दोघांनाही विश्वास आहे.

करगणीचा सचिन सर्जेराव खिलारी गोळाफेकीत, तर दुसरा कौठुळीचा सुकांत इंद्रजित कदम बॅडमिंटनमध्ये सहभागी होणार आहे. दोघांचेही शिक्षण करगणी आणि कौठुळीत जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळेत झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण आटपाडीत झाले. विशेष म्हणजे दोघेही मेकॅनिकलमधून अभियंता झाले आहेत. दोघांचेही वडील शेतकरी असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.

Para Olympic
विशाळगड दंगलीनंतर भेदरलेल्या कोवळ्या मुलांची शाळाही दुरावली; दंगल होऊन चार दिवस उलटले, तरी मुलं भीतीच्या छायेखाली

सचिनचा बालपणी अपघात झाल्याने एका हाताला अपंगत्व आले. तो गोळाफेकीत सहभागी होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने जागतिक पॅराअॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ‘शॉटपूट एफ ४६’मधून सुवर्णपदक पटकावले आहे. महाविद्यालयात तो भालाफेक करत होता; मात्र त्याची शरीरयष्टी बघून त्याच्या प्रशिक्षकांनी गोळाफेकीकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला पॅराऑलिंपिकच्या स्वतंत्र स्पर्धा असतात ते समजले. त्याआधी तो खुल्या गटातून खेळत होता.

Para Olympic
उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल; विशाळगडावरुन उदयनराजेंचा अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा

२०१९ मध्ये जयपूरला झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याने खूप मेहनत आणि कष्ट घेऊन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ८४ किलोवरून १२० किलो वजन केले. जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानी आहे. सुकांत क्रिकेट खेळताना पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तो बॅडमिंटन खेळतो. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून पुरुष दुहेरीत प्रमोद भगतचा जोडीदार आहे. ही जोडी पॅरामधून जागतिक स्तरावर अव्वल स्थानी आहे. २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावले आहे.

तसेच जागतिक स्पर्धेत २०१९, २२ आणि २४ मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. आय. डब्ल्यू. ए. एस. या जागतिक स्पर्धेत २०२१ मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. स्पेनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य, तर पेरूमधील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. याशिवाय त्याला ‘शिवछत्रपती’ व ‘एकलव्य खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सचिन आणि सुकांत या दोघांच्या पॅरा ऑलिंपिकमधील कामगिरीकडे लक्ष लागले आहे. दोघांनाही पदकांची आशा आणि विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.