Serena Williams : 'मी पुरूष असते तर निवृत्ती घेतली नसती'

Serena Williams Says If She is Male Still She Would be out there playing Tennis and winning
Serena Williams Says If She is Male Still She Would be out there playing Tennis and winningesakal
Updated on

Serena Williams : टेनिस कोर्ट गाजवणारी सेरेना विलियम्सने आपल्या दीर्घ आणि अत्यंत यशस्वी कारकिर्द संपवण्याचे (Retirement) संकेत दिले आहेत. तिने आपल्या निवृत्तीची योजाना जाहीर करताना आता आपण आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करणार असल्यांचे सांगितले. 23 ग्रँड स्लॅम जिंकणारी सेरेना विलियम्सने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच ती व्होग मासिकाच्या कव्हर स्टोरीवर झळकली.

Serena Williams Says If She is Male Still She Would be out there playing Tennis and winning
Chess Olympiad : पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी; स्टॅलिन यांची घोषणा

व्होग मासिकातील मुलाखतीत ती म्हणाली की, तिला तिची कारकिर्द आणि अजून मुले यामधील एक गोष्ट निवडायची नाहीये. मात्र वयाच्या 41 व्या वर्षी तुम्हाला कशाचा तरी त्याग करावा लागले. सेरेना विलियम्स म्हणते की, 'हे खूप चुकीचे आहे. जर मी पुरूष असते तर मी हा लेख लिहित नसते, मैदानावर खेळत असते आणि जिंकत असते. दुसरीकडे माझी बायको आमचे कुटुंब वाढवण्यासाठी प्रसुती वेदना सहन करत असती. जर मला संधी मिळाली असती तर मी फुटबॉलपटू टॉम ब्रॅडीलाही मागे टाकले असते.'

दरम्यान, विलियम्सने आपल्या निवृत्तीची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. तिने युएस ओपन खेळणार असल्याचे संकेत दिले आहे. युएस ओपन ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे. सेरेना म्हणाली की, 'दुर्दैवाने यंदाची विम्बल्डन जिंकण्याच्या दृष्टीने माझी तयारी झाली नव्हती. याचबरोबर मी युएस ओपन देखील जिंकण्यासाठी तयार आहे की नाही हे माहिती नाही. मात्र मी माझे सर्व प्रयत्न करणार आहे.'

Serena Williams Says If She is Male Still She Would be out there playing Tennis and winning
Raksha Bandhan : रक्षाबंधनाआधीच अर्जुनने सारा तेंडुलकरला दिली 'ही' खास भेट, चाहते म्हणाले...

विलियम्स आणि तिचा पती रेडीट हे गेल्या वर्षभरापासून अजून एका अपत्यासाठी प्रयत्न करत आहे. सेरेनाने 2017 मध्ये अॅलेक्सिस ऑलिम्पिया ओहानियन ला जन्म दिला होता. विलियम्सने टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर सेरेना व्हेंच्युर या स्वतःच्या व्हेंच्युर कॅपिटल फर्मवर लक्ष केंद्रीत करणार आहे. ही कंपनी प्रामुख्याने महिला आणि कृष्णवर्णीय लोकांनी सुरू केलेल्या व्यवसायात गुंतवणूक करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.