Brij Bhushan Sharan Singh : ब्रिज भुषण यांच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसात तक्रार

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singhesakal
Updated on

Brij Bhushan Sharan Singh : भाजप खासदार आणि भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ब्रिज भुषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सात महिला कुस्तीपटूंनी त्यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध क्रीडा मंत्रालयाने एक चौकशी समिती नेमली होती. आता शुक्रवारी दिल्लीतील कनौट प्लेस पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.

Brij Bhushan Sharan Singh
IPL 2023: अर्शदीप सिंगचे दोन चेंडू अन् BCCIला बसला 30 लाखांचा फटका

ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध पोलिसात केलेली तक्रार ही दिल्ली महिला आयोगच्या सहाय्याने करण्यात आली आहे. याबाबत आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी सांगितले की, 'काही महिला यात अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे, त्यांनी आरोपीने तो भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्याविरूद्ध लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.' मालिवाल यांनी या प्रकरणी डीसीपींना पत्र लिहिले आहे आणि ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने एएनआयला सांगितले की, 'ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध नक्कीच पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार कनौट प्ले पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.' दुसऱ्या एका कुस्तीपटूने सांगितले की, 'आम्ही ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रकरणात क्रीडा मंत्रालयाकडून कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. आता आम्ही पोलीस पुढची काय कारवाई करतात याची वाट पाहत आहोत.'

Brij Bhushan Sharan Singh
IPL 2023 : 'सामनावीर पुरस्कारासाठी मी नाही तर हा खेळाडू खरा दावेदार...' - सॅम करन

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध तक्रार मिळाली आहे. त्यांनी एफआयआर दाखल करण्यापूर्वी चौकशी सुरू देखील केली आहे. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. ब्रिजभुषण यांच्याविरूद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने भारताची बॉक्सर मेरी कोम हिच्या अध्यक्षतेखाली एक समिती 23 जानेवारीला नेमली होती. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला. त्यानंतर अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली. हा अहवाल सादर झाल्यानंतर मात्र अजून तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.