Hockey World Cup 2023 : 70 मिनिट हैं तुम्हारे पास... म्हणणारा शाहरूख खान वर्ल्डकपकडे फिरवणार पाठ?

Hockey World Cup 2023 Shah Rukh Khan
Hockey World Cup 2023 Shah Rukh Khanesakal
Updated on

Hockey World Cup 2023 Shah Rukh Khan : ओडिसामध्ये आजपासून पुरूष हॉकी वर्ल्डकप सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ स्पेनशी भिडणार आहे. दरम्यान, चक दे इंडिया चित्रपटामार्फत हॉकीला थोडंफार ग्लॅमर मिळवून देणाऱ्या शाहरूख खानला एका चाहत्याने हॉकी पाहणार का असा प्रश्न विचारला त्यावेळी उत्तर देताना शाहरूख खानने भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या.

Hockey World Cup 2023 Shah Rukh Khan
Lalit Modi : थेट परदेशातून ललित मोदींची सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना धमकी

शाहरूख खानला टॅग करत अन्सुमन सारंगी यांनी ट्विट करून एक प्रश्न विचारला होता. त्याने 'तुम्हाला हॉकी पहायला आवडते का, ओडिसात हॉकी वर्ल्डकप होत आहे. तेथे भेट देण्याची काही योजना आहे का? चक दे इंडिया'

यावर शाहरूख खानने प्रतिक्रिया दिली की, 'मला ओडिसाला जाणे आवडले असते. मात्र मी इथे कामानिमित्त व्यग्र आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सामने पहाल.... भारतीय संघाला शुभेच्छा.'

Hockey World Cup 2023 Shah Rukh Khan
Ravindra Jadeja : जडेजाच्या एका ओळीच्या ट्विटनं चर्चेला उधाण; निशाण्यावर आहे तरी कोण?

हॉकी वर्ल्डकप 13 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे आयोजित केली जाणार आहे. भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. आता वर्ल्डकपमध्ये देखील संघ चांगली कामगिरी करून वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी उत्सुक असले.

शाहरूख खान सध्या पाठणच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पठाण 25 जानेवारी 2023 ला चित्रपट गृहात प्रदर्षित होणार आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध केला आहे. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()