KKR नंतर शाहरुखने खरेदी केली महिला क्रिकेटची टीम, ट्विटरवर म्हणाला...

KKR नंतर आता शाहरुख खान बनला महिला क्रिकेट संघाचा मालक
Shah Rukh Khan owner women cricket team
Shah Rukh Khan owner women cricket team
Updated on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाची घोषणा केली आहे. तेव्हापासून तो सतत चर्चेत असतो आता शाहरुख खान महिला क्रिकेट संघाचा मालक बनल्याचे वृत्तसमोर आले आहे. 'चक दे ​​इंडिया' चित्रपटात महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणारा अभिनेता शाहरुख खान आता महिला क्रिकेट संघाचा मालक बनला आहे. शाहरुख खान आयपीएल टीम केकेआर (Kolkata Knight Riders) चा मालक आहे आणि आता त्याने महिला क्रिकेट संघ देखील विकत घेतला आहे. शाहरुख खाननेही आपल्या महिला क्रिकेट संघाचे नाव KKR प्रमाणेच ठेवले आहे.(Shah Rukh Khan owner women cricket team)

शाहरुख खानने आपल्या महिला क्रिकेट संघाचे नाव TKR (Trinbago Knight Riders) असे ठेवले आहे. संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आले आहे. सर्वप्रथम नाइट रायडर्स महिला संघाला नमस्कार ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला सीपीएलच्या उद्घाटनासाठीही हा संघ लढणार आहे.

शाहरुख खानने हे ट्विट रिट्विट करताना आनंद व्यक्त केला आहे आणि लिहिले आहे - KKR मधील आपल्या सर्वांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा सामना पाहण्यासाठी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. शाहरुख खानचा हा महिला क्रिकेट संघ महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना खेळणार आहे.

शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने सिनेमातून बराच ब्रेक घेतला होता. लवकरच तो अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अॅटली यांचा चित्रपट जवान, यशराजचा चित्रपट पठाण आणि राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटात तो नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.