Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदीनं स्पीडगनला दोष देत स्वतःच करून घेतलं हसं

Shaheen Afridi
Shaheen Afridiesakal
Updated on

Shaheen Afridi : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला नुकतेच पाकिस्तान टी 20 संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. शाहीन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत फारशी चमक दाखवू शकला नाही. या दौऱ्यावेळी असं दिसून आलं की शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीतील वेग कमी झाली आहे.

याबाबत शाहीन आफ्रिदीला विचारण्यात आलं त्यावेळी त्याने स्पीडगनला दोष दिला. शाहीनने न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शाहीन म्हणाला की, 'स्पीडगनने आश्चर्यकारकरित्या माझ्या गोलंदाजीचा वेग हा 132 ते 133 किलोमीटर प्रतितास दाखवला. मी तर सरासरी 140 किलोमीटर प्रतितासपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो.'

Shaheen Afridi
R Ashwin On Riyan Parag : रियान परागला अवास्तव महत्व? अश्विन म्हणतो आयपीएलमधील कामगिरीमुळे...

पाकिस्तान सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाकिस्तान शुक्रवारी ऑकलँडमधील इडन पार्कवर पहिला टी 20 सामना खेळणार आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच टी 20 सामन्यांची मालिका होईल.

दरम्यान, शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानच्या टी 20 संघाचे नेतृत्व हातत दिल्याबद्दल आभार मानले. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर आपण नव्या आव्हानासाठी सज्ज आहे असं सांगितलं.

Shaheen Afridi
Ranji Trophy Bihar : येरे माझ्या मागल्या... पुन्हा बिहारचे दोन संघ उतरणार मैदानावर

शाहीन म्हणाला की, 'पाकिस्तानचे नेतृत्व करणं माझ्यासाठी खूप रोमांचित करणारं आणि गौरवशाली क्षण आहे. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा कॅप्टन्सी करणं सोपं नाही. न्यूझीलंडविरूद्ध आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मात्र ही जगातील एक सर्वोकृष्ट टीम आहे. आम्हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करावी लागले.

शाहीनने पाकिस्तान संघ आगामी टी 20 वर्ल्डकपची तयारी म्हणून काही गोष्टींमध्ये प्रयोग करणार असल्याचे सांगितलं. यामध्ये सलामीच्या जोडीत बदल करणे याचा समावेश आहे. बाबर आझम सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.