Shaheen Afridi : 4, 4, 4, 4, 2... डिकॉकनं फोडलं; मात्र शाहीननं बदला घेत शामीशी केली बरोबरी

Shaheen Afridi
Shaheen AfridiESAKAL
Updated on

PAK vs SA World Cup 2023 : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने आफ्रिकेसमोर 271 धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने या आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली.

सलामीवीर क्विंटन डिकॉकने पाकिस्तानचे प्रमुख अस्त्र शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात सलग 4 चौकार मारत धमाका केला. मात्र दुसऱ्या षटकात शाहीनने बदला घेत 13 चेंडूत 24 धावा ठोकणाऱ्या क्विंटन डिकॉकला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

Shaheen Afridi
IND vs ENG Playing 11 : लखनौची खेळपट्टी आहे तरी कशी ... प्लेईंग 11 निवडताना रोहितला द्यावा लागणार शामीचा बळी?

विशेष म्हणजे शाहीनने सलग 21 वनडे सामन्यात विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शाहीनने मोहम्मद शामीशी बरोबरी केली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानावर नेपाळचा संदीप लामिछाने आहे. त्याने सलग 33 वनडे सामन्यात विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये सलग 21 सामन्यात विकेट घेणारा शाहीन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

Shaheen Afridi
IPL 2024 Auction : तारीख ठरली! बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या लिलावासंदर्भात दिली मोठी अपडेट

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरूवातीनंतर पाकिस्तानच्या मधल्या फळीने डाव सावरत छोट्या मात्र महत्वपूर्ण भागीदारी रचल्या.

कर्णधार बाबर आझमने 50, सौद शकीलने 52 तर शादाब खानने 43 धावा करत पाकिस्तानचा डाव सावरला. रिझवानने 31 तर नवाझने 24 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने चार विकेट्स घेतल्या तर मार्को यानसेनने 3 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानच्या 271 धावांचा पाठलाग करताना जरी दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर बाद झाले तरी त्यांनी 18 षटकात 2 बाद 121 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतर पाकिस्तानने आफ्रिकेला डुसेन (21) आणि क्लासेन (12) असे दोन धक्के दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.