Shaheen Shah Afridi Fitness Update : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली. शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या दुखापतीवर मात केली असून तो पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्डकप संघात परतला आहे. तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या सराव सामन्यात खेळणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वैद्यकीय सल्लागार समिती शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीतून कसा सावरतोय याच्यावर नजर ठेवून होती.
शाहीन आफ्रिदी इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरूद्ध 17 आणि 19 ऑक्टोबरला होणाऱ्या सराव सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. शाहीन याबाबत म्हणाला की, 'देशाच्या संघात पुन्हा दाखल होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये मी माझी भुमिका बजावण्यासाठी सज्ज झालो आहे. हा काळ माझ्यासाठी खूप कठिण होता. माझ्या आवडत्या संघापासून आणि क्रिकेपासून दूर राहणे खूप कठिण होते. मला काही अटीतटीच्या आणि रंजक सामन्यात भाग घेता आला नाही.'
शाहीन पुढे म्हणाला की, 'मी गेल्या 10 दिवसांपासून सहा ते आठ षटके सातत्याने टाकत आहे. मी माझ्या फुल रन - अपने गोलंदाजी करत आहे. मी नेट्समध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद घेतला. मात्र सामना खेळण्याची जी फिलिंग आहे त्याची सर कशाला नाही. मी सामना खेळण्यासाठी उत्सुक आहे.'
दरम्यान, संघ व्यवस्थापन आफ्रिदीचा मॅच फिटनेस दोन सराव सामन्यादरम्यान तपासून पाहणार आहे. आशिया कपला मुकल्यानंतर शाहीन गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी लंडनला रवाना झाला होता. याबाबत बोलताना शाहीन म्हणाला की, 'उपचार आणि तंदुरूस्ती मिळवण्यासाठीचा कार्यक्रम खूप चांगला होता मी त्याचा आनंद घेतला. खरं सांगायचं तर मी पूर्वीपेक्षा चांगला फिट झालो आहे. आता मी पाकिस्तानचं किट घालण्यासाठी वाट पाहू शकत नाही.' पाकिस्तान टी 20 वर्डकपमध्ये आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे कट्टर प्रतिस्पर्धी भारतासोबत खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.