Shahid Afridi PCB : ज्यावेळी पीसीबीतील चेहरे बदलतात... जावयाला कर्णधारपदावरून हटवण्याच्या वृत्तानंतर आफ्रिदी जाम भडकला

Shahid Afridi Shaheen Afridi Captaincy PCB : शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे.
Shahid Afridi
Shahid Afridi esakal
Updated on

Shahid Afridi On Shaheen Afridi Remove On T20 Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नवीन चेहरे आले असून आता पाकिस्तान पुरूष संघात पुन्हा एकदा कर्णधार बदलाच्या हालचालींना वेग आला आह. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीसीबी शाहीन आफ्रिदीला पाकिस्तानच्या टी 20 कर्णधारापदावरून काढून टाकणार आहे. याचबरोबर शान मसूदकडून देखील कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेण्य्याची शक्यता आहे.

बाबर आझमने चार महिन्यापूर्वी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर बाबर आझमने हा निर्णय घेतला होता. आता मात्र या निर्णयाचा पुर्नविचार करण्यात येत असून पीसीबी बाबर आझमल पुन्हा एकदा सर्व फॉरमॅटमध्ये कॅप्टन्सी देण्याचा विचार करत आहे. या निर्णयावर शाहीन आफ्रिदीचा सासरा शाहिदने जोरदार टीका केली असून तो जाम भडकला.

Shahid Afridi
Babar Azam : आफ्रिदीचे कर्णधारपद धोक्यात... बाबर आझमला पुन्हा मिळणार पाकिस्तान संघाचे नेतृत्व?

वेळ द्यायला हवा

शाहिद आफ्रिदी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, 'मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून नियुक्त करता त्यावेळी तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. आपल्या क्रिकेटची एक मोठी अडचण ही आहे की ज्यावेळी बोर्डात नवे चेहरे येतात किंवा चेहरे बदलतात त्यावेळी जो नवा माणूस येतो तो विचार करतो की मी जे करतोय तेच पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वश्रेष्ठ आहे.' शाहिदने शाहीनला स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला थोडा वेळ द्यायला हवा असं मत मांडले.

Shahid Afridi
Ashish Nehra: क्रिकेटचा की फुटबॉलचा प्रशिक्षक? गुरु नेहराजींची का होतेय चर्चा? Video Viral

तो म्हणाला, 'जर तुम्ही कर्णधार बदललात तर एकतर त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय चुकीचा होता किंवा आता बदलण्याचा निर्णय चुकीचा आहे.' गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर शाहीनची टी-२० कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वेळी शान मसूद कसोटी कर्णधार झाला. एकदिवसीय संघाचे कर्णधारपद कोणालाही देण्यात आले नाही. मात्र, पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष झका अश्रफ होते.'

'यानंतर मोहसीन नक्वी हे पीसीबीचे अध्यक्ष झाले असून ते पुन्हा एकदा व्यवस्थापनात बदल करण्याच्या विचारात आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब झाली होती.' त्यानंतर बाबर आझमला तीनही क्रिकेट प्रकारातील आपले कर्णधारपद सोडावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.