Shahid Afridi VIDEO : सासरेबुवांनी दाखवला होणाऱ्या जावयाला हिसका; टोलवला असा काही की...

Shahid Afridi Hit Shaheen Afridi
Shahid Afridi Hit Shaheen Afridi esakal
Updated on

Shahid Afridi Hit Shaheen Afridi : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असून आता तो पाकिस्तान सुपर लीगसाठी तयारी करतोय. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पुन्हा त्याच्या गुडघ्याल दुखापत झाली होती.

Shahid Afridi Hit Shaheen Afridi
Ranji Trophy 2023 : सेमी फायनलचं स्टेज सजलं! हनुमाची 'एक'हाती झुंज व्यर्थ तर मयांक, मनोजची टीम झाली पास

मात्र आता तो नेट्समध्ये गोलंदाजी करत असून पाकिस्तान सुपर लीगच्या आठव्या हंगमासाठी सज्ज होत आहे. दरम्यान, नेट्समध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि होणारा जावई शाहीन यांची जुगलबंदी पहायला मिळाली. सराव सत्रादरम्यान शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानचा सध्याचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला षटकार खेचत सासरा होणाऱ्या जावयापेक्षा वरचढ असल्याचे दाखवून दिले.

नुकतेच पाकिस्तान सुपर लीगचा माजी विजेत्या संघाचा कर्णधार लाहोर कलंदर्स शाहीन आफ्रिदीने आपल्या रिहॅबिलिटेशनवर वक्तव्य केलं होतं. तो क्रिकेट सोडण्याचा विचार करत होता. मात्र त्याने स्वतःचे जुने व्हिडिओ पाहून स्वतःला मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न केला होता.

Shahid Afridi Hit Shaheen Afridi
IND vs AUS Test Series : कांगारूंची आयडियाची कल्पना; अश्विनविरूद्ध अश्विनचाच डुप्लिकेट?

शाहीन यूट्यूब चॅनलवर म्हणाला होता की, 'एक क्षण असा आला होता की मी सर्व सोडून देण्याच्या मानसिकतेत होतो. मी फक्त माझे स्नायू बळकट करण्यावर काम करत होते. आणि त्यात सुधारणा होत नव्हती. मी रिहॅबिलिटेशन सत्रात मी स्वतःलाच सांगत होतो की आता बस झालं मी यापुढे काही करू शकत नाहीये.'

आफ्रिदी पुढे म्हणाला की, 'मात्र त्यानंतर मी माझे यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होते. मी किती चांगली कामगिरी केली आहे हे पाहून मी स्वतःला मोटिव्हेट करत होतो. मी स्वतःला अजून थोडा जोर लावण्यास सांगत होते. एका वेगवान गोलंदाजाला दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावे लागणे हे निराशाजनक असते.'

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()