खरंच नंबर-1 व्हायच आहे का टाइमपास? शाहिद आफ्रिदीचा विराटच्या अ‍ॅटिट्यूडवर प्रश्न

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने वादग्रस्त विधान करताना कोहलीच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
shahid afridi questions virat kohli attitude
shahid afridi questions virat kohli attitude
Updated on

Shahid Afridi Questions Virat Kohli's Attitude: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच शाहिद आफ्रिदीने देखील असेच एक विधान केले आहे जे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांना आवडणार नाही. भारताचा हा स्टार फलंदाज आता जरा खराब फॉर्ममधून जात आहे. कोहलीने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून दोन वर्षे होत आले आहे. कोहलीला आयपीएलमध्येही अनेकवेळा गोल्डन डकचा शिकार झाला आहे. अशा परिस्थितीत शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीवर निशाणा साधताना आहे.

shahid afridi questions virat kohli attitude
'स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटत...' टीम इंडियात संधी मिळताच Rahul Tripathi भावूक

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने वादग्रस्त विधान करताना कोहलीच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, भारतीय क्रिकेटच्या सुपरस्टारने सध्याच्या परिस्थितीत तो कुठे आहे याचा आढावा घेणे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये अ‍ॅटिट्यूड सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्हाला क्रिकेटची आवड आहे की नाही? कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जगातील नंबर वन बॅट्समन व्हायचे होते, पण तो अजूनही त्याच प्रेरणेने खेळतोय का? हा मोठा प्रश्न आहे. विराटकडे क्लास आहे, पण त्याला पुन्हा नंबर वन व्हायचे आहे का? किंवा विराटला वाटते की त्याने आयुष्यात सर्व काही मिळवले आहे. हे सर्व त्यांच्या वृत्तीवर अवलंबून असते.

shahid afridi questions virat kohli attitude
IPL च्या प्रगतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला लागली मिर्ची

विराट बऱ्याच दिवसांपासून त्याच्या शैलीत फलंदाजी करताना आपल्या दिसत नाही. विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते, त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. आयपीएलमध्ये विराटने दोन अर्धशतकांच्या मदतीने 341 धावा केल्या. मात्र, तो तीनदा गोल्डन डकचाही बळी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडसारख्या महत्त्वाच्या दौऱ्याच्या तयारीसाठी कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. आयपीएल दरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी कोहलीला फ्रेश होण्यासाठी ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता.

shahid afridi questions virat kohli attitude
अखेर पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ; आयर्लंड दौऱ्यात करणार नेतृत्व

कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 101 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 97 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 8043 धावा, एकदिवसीय सामन्यात 12311 धावा आणि टी-20 मध्ये 3296 धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत 27 आणि एकदिवसीय सामन्यात 43 शतके झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.