Pakistan Team In India :पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने दावा केला आहे की २००५मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकल्यानंतर बंगळूरमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ्याच्या बसवर दगडाफेक करण्यात आली होती.
आफ्रिदीने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक याच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यात त्याने हा दावा केला. पाकिस्तान संघ त्यावेळी ३ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता.
कसोटी मालिका १-१ने बरोबरीत सुटली, तर एकदिवसीय मालिका पाहुण्यांनी ४-२ने आपल्या खिशात घातली.
२००५मध्ये त्या कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहाली या ठिकाणी खेळला गेला, जो अनिर्णित राहीला. त्यानंतर भारतीय संघाने ईडन गार्डन मैदानावर खेळलेला दुसरा कसोटी सामना भारताने १९५ धावांनी जिंकत मालिकेत १-०ची आघाडी घेतली.
मालिकेतील शेवटचा सामना बंगळूर येथे खेळला गेला, ज्यात पाकिस्ताने भारताचा १६८ धावांनी दणदणीत पराभव केला. शाहिद आफ्रिदीने आपल्या विधानात याच कसोटी सामन्याचा उल्लेख केला होता.
शाहिद आफ्रिदी म्हणाला की, "तो आमच्यासाठी दबावाचा क्षण होता. आम्ही चौकार आणि षटकार लगावत होतो,पण आमच्यासाठी कोणीही टाळ्या वाजवत नव्हतं. अब्दुल रझ्झाकला लक्षात असेल की बंगळूर कसोटी सामना जिंकल्यावर आमच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. खेळताना दबाव नेहमी राहतो आणि तुम्हाला त्या दबावाचा आनंद घेता आला पाहिजे."(Latest marathi News)
या माजी अष्टपैलू खेळाडूने हेही सांगितले की पाकिस्तान संघाने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात गेलं पाहिजे आणि जिंकून परत आलं पाहिजे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अजुनही पाकिस्तानी संघ भारतात येण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
अशातच, पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला आहे.(Latest Marathi News)
आफ्रिदी म्हणाला की, "लोक म्हणतायंत की पाकिस्तान संघाला विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात नाही गेलं पाहिजे, त्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला पाहिजे. मी याच्या विरोधात आहे. मला वाटतं की आपण तिकडे गेलं पाहिजे आणि जिंकून परत आलं पाहिजे. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.