Shahid Afridi IND vs ENG T20 Match: रोहित शर्माची कर्णधार म्हणून शानदार कामगिरी इंग्लंडमध्ये ही सुरूच आहे. शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या विजयामुळे केवळ भारतीयच नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही या विजयाने खूप खूश दिसत आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताला या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा मोठा दावेदार असल्याचे सांगितले आहे. आफ्रिदीने आयसीसीच्या ट्विटवर कमेंट करताना लिहिले की, भारतीय संघ अप्रतिम क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे तो ही मालिका जिंकण्यास पात्र आहे. खरोखर प्रभावी गोलंदाजी होत आहे. भारतीय संघ यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वात आवडत्या संघापैकी एक आहे हे मात्र निश्चित आहे.
यावर्षी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यंदाचा विश्वचषक १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून १३ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा - ऋषभ पंतने जबरदस्त सुरुवात दिली. मात्र दोघेही बाद होताच भारताचा डाव डगमगला. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांना कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 170 धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी अशी अप्रतिम कामगिरी केली की इंग्लंड पूर्णपणे अस्वस्थ झाले. इंग्लिश संघ अवघ्या 121 धावांवर ऑलआऊट झाला. भुवनेश्वर कुमार टीम इंडियाकडून गोलंदाजीत सर्वात मोठा हिरो ठरला, त्याने तीन बळी घेतले. भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.