चुकलंच! शाहरुखला सोडल्यावर प्रिती असाच विचार करत असेल...

IPL Mega Auction 2022
IPL Mega Auction 2022Sakal
Updated on

IPL Mega Auction 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शाहरुख खानने अक्षरश: धुमाकूळ घातला. विजय हजारे स्पर्धेतील दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये तामिळनाडूनं कर्नाटकला 151 धावांनी पराभूत केले. जयपुरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात तमिलनाडूनं निर्धारित 50 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 354 धावा केल्या होत्या. तामिळनाडू संघाकडून एन जगदीशन (N Jagadeesan) याने शतकी धमाका केला. त्याच्याशिवाय सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शाहरूख खानने (Shahrukh Khan) अवघ्या 39 चेंडूत 79 धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरूखने आपल्या या स्फोटक खेळीत 7 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या खेळीच्या जोरावर तामिळनाडूनं निर्धारित 50 षटकांत 354 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ 39 षटकात 203 धावांत आटोपला. तामिळनाडू संघाकडून आर सिलंबरासन याने 4 तर वाशिंग्टन सुंदरने 3 विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

शाहरूखची फिनिशिंग इनिंग प्रितीला खुणावणारी?

आयपीएलच्या गत हंगामात शाहरुख खान (SRK) पंजाब किंग्ज (PBKS) च्या संघातून खेळताना दिसले होते. आयपीएलच्या लिलावात शाहरुखला घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरस झाली होती. फायनली शाहरुख आपल्या ताफ्यात आल्यानंतर पंजाबच्या मालकीण बाई प्रिती झिंटा भल्यातच खूश झाल्या होत्या. पण यंदाच्या मेगा लिलावापूर्वी पंजाबने शाहरुख खानलाही रिलीज केले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शाहरुखची फटकेबाजी प्रितीच्या नजरा पुन्हा आपल्याकडे फिरवण्यासाठी भाग पाडणारी आहे. मेगा लिलावात प्रिती पुन्हा शाहरुखला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी धडपडताना दिसली तर नवल वाटू नये.

IPL Mega Auction 2022
PKL 2021 : 'ले पंगा' कधी कुठे अन् कसे पाहायचे सामने?

विजय हजारे ट्रॉफीत शाहरूख (Shahrukh Khan in Vijay Hazare Trophy) ची कामगिरी

शाहरुख खानने 5 सामन्यात 194 धावा केल्या आहेत. तळाला फलंदाजीला येत सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळीनं त्यानं लक्षवेधून घेतलं आहे.

विजय हजारे 2021-22 मध्ये शाहरुख खानची कामगिरी

66 (35)

32 (12)

8 (8)

9 (10)

79* (39)

शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला मिळवून दिलं होत जेतेपद

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शाहरुखने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून तामिळनाडू संघाला विजय मिळवून दिला होता. सय्यद मुश्ताक अली टॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये तामिळनाडूला अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती. अशक्यप्राय वाटणाऱ्या या सामन्यात शाहरुखने षटकार खेचून संघाला जेतेपद मिळवून दिले. या सामन्यात त्याने 15 चेंडूत 33 धावांची खेळी केली होती.

IPL Mega Auction 2022
जपाननं ऑलिम्पिक चॅम्पियन टीम इंडियाला रोखून दाखवलं

पंजाब किंग्जनं केल रिटेन

आयपीएल रिटेंशनवेळी पंजाब किंग्ज (Punjan Kings) ने शाहरूखला रिटेन केले नाही. त्यामुळे आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auctions) तो उतरल्याचे पाहायला मिळेल. देशांतर्गत क्रिकेटमधील फटकेबाजीमुळ मेगा लिलावात त्याच्यावर पैशाची बरसात होण्याचे संकेत देणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.