Football Tournament : फुटबॉल सामन्यात प्रथमच होणार 'टायब्रेकर'चा अवलंब; KSA लीगचे वेळापत्रक जाहीर

या हंगामात कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने खेळाचे नियम व आचारसंहिता तयार केली आहे.
Shahu Chhatrapati KSA League Football Tournament
Shahu Chhatrapati KSA League Football Tournamentesakal
Updated on
Summary

या वर्षीपासून प्रथमच सीनियर गटामध्ये टायब्रेकरच्या नियमाचा अवलंब होणार आहे.

कोल्हापूर : येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (Kolhapur Sports Association) आयोजित श्री शाहू छत्रपती केएसए साखळी फुटबॉल स्पर्धेत (Football Tournament) प्रथमच सामना बरोबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये घेतला जाणार आहे. पंधरा डिसेंबरपासून स्पर्धेस प्रारंभ होणार असून, याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

आता स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ (ब) या संघांमध्ये पंधरा डिसेंबरला दुपारी दीड वाजता पहिला सामना होणार आहे. दुसरा सामना दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ या संघात होणार आहे.

Shahu Chhatrapati KSA League Football Tournament
Ravi Bishnoi ICC T20 Ranking : टी 20 रँकिंगमध्ये मोठा धमाका; रवी बिश्नोईने राशिद खानचे सिंहासन हिसकावले

या हंगामात कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने खेळाचे नियम व आचारसंहिता तयार केली असून, ती सर्व संघ प्रतिनिधींना दिली आहे. वरिष्ठ साखळी स्पर्धा सीनियर सुपर एठ (वरचा गट) आणि सीनियर एट (खालचा गट) या गटांत होणार आहे. सीनियर सुपर एट गटामध्ये विजयी संघाला तीन गुण, पराभूत संघाला शून्य गुण, तर बरोबरी राखणाऱ्या संघाला एक गुण देण्यात येणार आहे.

Shahu Chhatrapati KSA League Football Tournament
Faf Du Plessis : फाफ निवृत्तीतून बाहेर येणार; आयपीएल 2024 च्या हंगामात आरसीबीला शोधावा लागणार नवा कर्णधार?

मात्र, सिनियर एठ (खालचा गट) गटामध्ये सामना बरोबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागणार आहे आणि पराभूत संघाला शून्य गुण मिळणार आहेत. या वर्षीपासून प्रथमच सीनियर गटामध्ये टायब्रेकरच्या नियमाचा अवलंब होणार आहे. या गटात झुंजार क्लब, बीजीएम स्पोर्टस्‌, संध्यामठ तरुण मंडळ, उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (ब), सोल्जर ग्रुप, कोल्हापूर पोलिस, सम्राट नगर स्पोर्टस् या संघांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()