Kieron Pollard : कायरन पोलार्डची जागा घेणार शाय होप!

वेस्ट इंडीज क्रिकेटला मिळणार नव्या दमाचे कर्णधार
Shai Hope
Shai Hope esakal
Updated on

इस्लामाबाद : वेस्ट इंडीजचा क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) 13 डिसेंबरपासून पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मात्र टी 20 वर्ल्डकपमध्ये विंडीजचे नेतृत्व करणारा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. तो वर्ल्डकप दरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय आणि टी 20 संघाचे कर्णधारपद शाय होप ( Shai Hope ) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) या दोन युवा खेळाडूंकडे सोपण्यात आले आहे.

Shai Hope
Ashes : पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडची धडाडणारी तोफच निकामी

दुखापतग्रस्त कायरन पोलार्डच्या जागी एकदिवसीय संघाचे नेतृत्व 28 वर्षीय विकेटकिपर शाय होप ( Shai Hope ) याच्याकडे सोपवले आहे. पोलार्डच्या अनुपस्थिती तर टी 20 संघाची धुरा 26 वर्षीय निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) सांभाळणार आहे. कायरन पोलार्डने टी 20 वर्ल्डकपमध्येच वेस्ट इंडीजची धुरा आता नव्या दमाच्या खेळाडूंकडे सोपवण्यात यावी असे संकेत दिले होते.

कायरन पोलार्ड हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याला ही दुखापत टी 20 वर्ल्डकपदरम्यान झाली होती. आता संघात कायरन पोलार्डच्या जागी टी 20 मध्ये रोवमॅन पॉवेलला संधी मिळणार आहे. तर एकदिवसीय संघात डेवोन थॉमस याला संधी मिळाली आहे.

Shai Hope
अमेरिकेचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीनची प्रत्युत्तराची धमकी

पाकिस्तान दौऱ्यासाठीचा वेस्ट इंडीजचा एकदिवसीय संघ

शाय होप ( कर्णधार ) ( Shai Hope ), निकोलस पूरन ( उपकर्णधार ), डॅरेन ब्रोव्हो, शमरह ब्रुक्स, रोटस्टन चेस, जस्टिन ग्रीव्स, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोजी, अँडरसन फिलिप, रेमन रिफर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, डेवोन थॉमस आणि हेडन वॉल्श ज्यूनियर.

Shai Hope
Sports News : ख्रिस गेलने निवडले 3 स्टार क्रिकेटपटू

पाकिस्तान दौऱ्यासाठीचा वेस्ट इंडीजचा टी २० संघ

निकोलस पूरन ( कर्णधार ), शाय होप ( उपकर्णधार )( Nicholas Pooran ), डॅरेन ब्रोव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक्स, अकील होसेन, ब्रँडन किंग, काईल मेयर्स, गडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, रोमारिया शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस आणि हेडन वॉल्श ज्यूनियर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.