Shai Hope Virat Kohli odi Cricket Records : झिम्बाब्वेमध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकपची पात्रता फेरी सुरू आहे. हरारे येथे आज वेस्ट इंडीज आणि नेपाळ यांच्यात सामना सुरू आहे. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय उलटा पडला. वेस्ट इंडीजने 50 षटकात 7 बाद 339 धावा ठोकल्या. यात कर्णधार शाय होपने 135 धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे 15 वे वनडे शतक होते. होपने या शतकी खेळीबरोबरच विराट कोहलीचा एक विक्रम देखील मोडला.
शाय होपने शतकांचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा विक्रम मोडला. शाय होप आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 15 शतके ठोकण्याऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. होपने आपली 15 वनडे शतके 105 डावात पूर्ण केली आहेत. विराट कोहलीला वनडेमध्ये 15 शतके पूर्ण करण्यासाठी 106 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर विंडीजने नेपाळविरूद्ध 50 षटकात 7 बाद 339 धावा ठोकल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या नेपाळने विंडीजची 5 षटकात 2 बाद 9 धावा अशी अवस्था केली होती. यानंतर सलामीवीर ब्रँडन किंग देखील 32 धावांची खेळी करून बाद झाला.
विंडीजचे 3 फलंदाज 55 धावात बाद झाल्यानंतर शाय होप आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 216 धावांची खेळी करत संघाला आधार दिला. होपने 129 चेंडूत 135 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर पूरनने 94 चेंडूत 115 धावा चोपल्या. यानंतर रोव्हमन पॉवेलने 14 चेंडूत 29 धावा चोपत संघाला 300 च्या पार पोहचवले. अखेर विंडीजने 50 षटकात 7 बाद 339 धावांपर्यंत मजल मारली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.