WI vs IND 2nd ODI : अखेर विंडीजने 10 पराभवाचे दुष्टचक्र संपवले; भारताला 6 विकेट्सने लोळवले

West Indies Vs India 2nd ODI
West Indies Vs India 2nd ODI esakal
Updated on

West Indies Vs India 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने कसलेल्या भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. वेस्ट इंडीजने आधी भारतीय संघाला 181 धावात गारद केले. त्यानंतर हे आव्हान त्यांनी 36 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आणली.

आता मालिकेचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात होणार आहे. विशेष म्हणजे विंडीजने भारताविरूद्धचे आपले 10 पराभवांचे दुष्टचक्र तोडले. (Shai Hope Captains Inning)

वेस्ट इंडीजकरडून कर्णधार शे होपने विंडीजला आशेचे किरण दाखवले. पहिल्या वनडे सामन्यात एकाकी झुंज देणाऱ्या होपला आजच्या सामन्यात केसी कार्टेची अनमोल साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 91 धावांची नाबाद खेळी केली. शे होपने 80 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. तर कार्टेने 65 चेंडूत नाबाद 48 धावांचे योगदान दिले.

West Indies Vs India 2nd ODI
Joe Root Ashes 2023 : राजस्थान रॉयल्स आज खुश तो बहुत होगे तुम... रूटने कसोटीत केली 'टी 20' खेळी

भारताचे 182 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजने दमदार सलामी दिली. सलामीवीर किंग आणि कायल मेयर्स यांनी 53 धावांची सलामी दिली. मात्र यानंतर शार्दुल ठाकूरने पाठोपाठ दोन विकेट्स घेत विंडीजला अडचणीत आणले.

ब्रँडन किंग 15 तर कायल मेयर्स 36 धावा करून एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर आलेला अथनाजे देखील 6 धावांचेच योगदान देऊ शकला. त्याचीही शिकार शार्दुलनेच केली. 3 बाद 72 धावा अशी अवस्था झालेल्या विंडीजला सावरण्यासाठी स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर क्रीजवर आला होता.

West Indies Vs India 2nd ODI
ICC T20 World Cup 2024 : अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक; पुढील वर्षी ४ ते ३० जूनदरम्यान विंडीजसह संयुक्तपणे होणार स्पर्धा

दुसऱ्या बाजूने कर्णधार शे होपने एक बाजू लावून धरली होती. या दोघांनी विंडीजला शतकाच्या जवळ पोहचवले होते. मात्र कुलदीप यादवच्या फिरकीने हेटमायरला चकवा दिला. 9 धावांवर खेळणाऱ्या हेटमायरचा कुलदीपने त्रिफळा उडवला.

विंडीजची अवस्था 4 बाद 91 धावा अशी झाली होती. मात्र यानंतर आलेल्या केसी कार्टेने आपल्या कर्णधाराची साथ सोडली नाही. या दोघांनी नाबाद 91 धावांची भागीदारी रचत भारताला पराभवाच्या खाईत लोटले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.